[ad_1]

फतेहपूर: तरुण समलैंगिक असतानाही घरच्यांनी हुंड्याचं आमिष दाखवत त्याचं एका तरुणीशी लग्न लावून दिलं. जेव्हा तरुणीला याबाबत कळालं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने माहेरी याची माहिती दिली. तेव्हा सासरच्यांनी तिला मारहाण केली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांत पोहोचलं. तरुणीने पतीसह पाच लोकांवरोधात हुंड्यासाठी जाच तसेच इतर त्रासासाठी तक्रार दाखल केली आहे.

उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथील खागा येथील एका तरुणीने पोलिसांत पती आणि सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीत तिने सांगितलं की २९ मे २०२१ मध्ये तिचं लग्न मनीष कुमार जायस्वालसोबत झालं होतं. तरुणीच्या वडिलांनी लग्नात हुंडा आणि इतर खर्चासह तब्बल ३४ लाख रुपये खर्च केले होते.
मॅट्रिमोनियल साईटवर भेट, खोटा IRS अधिकारी बनून लग्न, लेडी सिंघमच्या फसवणुकीची डेंजर कहाणी
लग्न झाल्यानंतर जेव्हा महिला सासरी पोहोचली तेव्हा सासरच्यांची तिच्यासोबत चांगली वागणूक केली नाही. पतीने तिला वैवाहिक आयुष्याचं सुखही दिलं नाही. याबाबत महिलेने आपल्या माहेरी सांगितलं. तेव्हा घरचे म्हणाले की सगळं ठीक होईल. त्यानंतर ती पुन्हा सासरी परतली. जेव्हा तिला सासरीची मंडळी घ्यायला आली तेव्हा त्यांनीही तिला आश्वासन दिले की काळजी करु नको सगळं ठीक होईल आणि तिला आपल्यासोबत घेऊन गेले. पण, वाटेतच सासू-सासरे आणि भासऱ्याने तिला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

सासरी परतलेल्या तरुणीने घडलेला सारा प्रकार पती मनीषला सांगितला. त्यानंतर मनीषने तिला रडत रडत सांगितलं की, मी तुझ्यासोबत विश्वासघात केला आहे. तू मला घटस्फोट दे. मी माझ्या कुटुंबाच्या आणि माम अमृतलाल यांच्या दबावाखाली येऊन तुझ्याशी लग्न केलं. तसेच, त्याने तिला सांगितलं की तो गे आहे. हे ऐकताच तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली.

जेलमधून आला, डाव रचला, मॉरिसचा निर्णय घोसाळकरांच्या जिवावर बेतला

जेव्हा तिने ही गोष्ट आपल्या माहेरी सांगणार असल्याचं म्हटलं, तेव्हा सासरच्यांनी तिला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर ही महिला आपल्या भावासोबत माहेरी परतली. याप्रकरणात महिलेच्या पती, सासू-सासरे, भासरा आणि त्याच्या मामासह पाचजणांवर हुंड्यासाठी जाच आणि मारहाणप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस या प्रकणाचा तपास करत आहेत. सध्या महिला तिच्या माहेरी राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *