[ad_1]

बंगळुरू: फिटनेस आयकॉन आणि बंगळुरुचे प्रसिद्ध सायकलपटू अनिल कदसूर यांचा मृत्यू झाला आहे. हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. ते ४५ वर्षांचे होते. गेल्या ४२ महिन्यांपासून ते दररोज १०० किलोमीटर सायकल चालवायचे. त्यांच्यामुळे अनेकांनी सायकलिंग सुरू केलं. अनेक सायकलपटू त्यांच्या भेटीसाठी आतुर असायचे. अनिल कदसूर यांचं सायकलिंग प्रेम त्यांच्यासाठी कौतुकाचा आणि आदराचा विषय होता.अनिल कदसूर यांनी ३१ जानेवारीला सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. गेल्या ४२ महिन्यांपासून दररोज १०० किलोमीटर सायकल चालवण्याचं लक्ष्य गाठल्याची माहिती त्यांनी पोस्टमधून दिली. त्याच रात्री अनिल यांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुर्दैवानं दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं निधन झालं.अनिल कदसूर गेल्या एक दशकापासून सायकलिंग करत होते. त्यांनी २.२५ लाख किलोमीटर अंतर सायकलवरुन कापलं होतं. त्यांच्यामुळे अनेकांना सायकलिंग करण्याची प्रेरणा मिळाली. कित्येक जण त्यांच्याशी हस्तांदोलन करायचे. त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याची सायकलपटूंची भावना होती. नव्या सायकलपटूंना प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलं. थेट संपर्कात असलेल्या आणि ऍक्टिव्हिटी ऍपच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली. त्यासाठी त्यांचे निकटवर्तीय त्यांना ‘एकलव्यांचे द्रोणाचार्य’ म्हणायचे. कदसूर यांच्याकडे सहा सायकल होत्या. गेल्या काही महिन्यांमध्ये हृदय विकाराच्या घटना वाढल्या आहेत. अनेक तरुणांचा हृदय विकाराच्या झटक्यांमुळे मृत्यू झाला आहे. त्यासाठी तणाव, जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या सवयी कारणीभूत आहेत. पण अनिल कदसूर यांच्या हृदय विकाराच्या झटक्यामागील कारण वेगळं असल्याचं डॉ. सुधीर कुमार यांनी एक्सवर सांगितलं. ‘अनिल दररोज जास्त व्यायाम करायचे. १०० किलोमीटर अंतर कापण्यासाठी ते दररोज ७ तास सायकल चालवायचे,’ अशी माहिती कुमार यांनी दिली.’व्यायाम शरीरासाठी गरजेचा असतो. पण अति व्यायाम केल्यास त्याचे उलटे परिणाम दिसतात. सुरुवातीला या व्यायामाचा फायदा होतो. पण आवश्यकतेपेक्षा अधिक व्यायाम केल्यास त्याचे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ लागतात. त्यामुळे मृ्त्यूचा धोका वाढतो. अनिल कदसूर दररोज सायकलिंग करायचे. त्यात खंड पडत नव्हता. त्यामुळे शरीराला पुरेसा आराम मिळत नव्हता. आठवड्यातून किमान एक दिवस तरी शरीराला विश्रांती गरजेची असते. अन्यथा मृत्यूचा धोका वाढतो,’ असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *