[ad_1]

पावसाळ्यात काय होतात पचनच्या समस्या

पावसाळ्यात काय होतात पचनच्या समस्या

साल्मोनेला आणि ई कोलाईसारख्या जीवाणूंनी संक्रमित असे कच्चे आणि कमी शिजवलेले अन्न खाल्ल्याने अन्न विषबाधा होते. दूषित पाणी वापरल्याने अतिसार आणि पोटाच्या संसर्गास आमंत्रण मिळते. गॅस्ट्रोएन्टेरिटिस किंवा पोटाचा फ्लू ही देखील आणखी एक समस्या आहे ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट, पोट आणि आतड्यांची जळजळ होते.

जेव्हा एखादी व्यक्ती संक्रमित लोकांच्या संपर्कात येते किंवा दूषित अन्न किंवा पाण्याचे सेवन करते तेव्हा त्या व्यक्तींस संसर्गाचा धोका असतो. जुलाब, उलट्या, पोटदुखी, वेदना, ताप, मळमळ आणि डोकेदुखी ही त्याची लक्षणे आहेत.

प्रोबायोटिक्सचा आहारात समावेश करा

प्रोबायोटिक्सचा आहारात समावेश करा

आतड्यांच्या आरोग्यासाठी प्रोबायोटिक्स उपयुक्त ठरतात. प्रोबायोटिक्स कमी पडल्यास, पचनाची समस्या अधिक प्रमाणात उद्भवते. दही, ताक यांचा आहारात समावेश करण्याने पचनाची समस्या कमी होण्यास मदत होते. याबाबत अधिक माहितीसाठी आवश्यक असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या.

(वाचा – Ice Bath चे आरोग्याला होणारे अफलातून फायदे, शरीराचा त्रासही होतो कमी)

पुरेसे पाणी प्या

पुरेसे पाणी प्या

पचनास मदत करण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असतो. दररोज किमान १० ते १२ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हे लक्षात ठेवा की शरीर ओव्हरहायड्रेट करु नका कारण ते देखील आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

(वाचा – ६१ वर्षाच्या सुनील शेट्टीच्या फिटनेसचे रहस्य, या ५ सफेद पदार्थापासून ठेवतो स्वतःला दूर)

कच्च्या भाज्या खाऊ नका

कच्च्या भाज्या खाऊ नका

वाफवलेल्या किंवा उकडलेल्या भाज्यांचा खाणे पचनासाठी योग्य ठरते. कच्च्या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू असू शकतात ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य बिघडून पोटाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात ही समस्या अधिक उद्भवते. त्यामुळे कच्च्या भाज्यांचे सेवन करणे सहसा टाळा.

(वाचा – निर्जल उपवास करत आहात का? पाणी न पिण्याने होईल गंभीर समस्या, १ दिवसात पोटात किती पाणी जाणे गरजेचे)

न शिजविलेले सी-फूड खाणे टाळा

न शिजविलेले सी-फूड खाणे टाळा

पावसाळ्यात पाणी दूषित असल्याने, सुशी, साशिमीसारखे कच्चे सीफूड खाल्ल्याने अतिसाराची समस्या उद्भवू शकते. एवढेच नाही तर जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि हवाबंद डब्यातील अन्नाचे सेवन करणे टाळा. पावसाळ्यात याच कारणामुळे मांसाहार करणे टाळले जाते. मांसाहार पचणे या काळात कठीण असते, त्यामुळे सहसा टाळा.

शर्करायुक्त पदार्थांचे सेवन टाळा

शर्करायुक्त पदार्थांचे सेवन टाळा

आईस्क्रीम, चॉकलेट, कँडी, मिठाईचे सेवन कमी करा ज्यामुळे शरीरात जळजळ होऊ शकते आणि आतड्याला त्रास होऊ शकतो. पावसाळ्याच्या दिवसात हे पचायला जड जाते. त्यामुळे हे पदार्थ सेवन करणे टाळा. आतड्याला त्रास होऊ पचनशक्तीची प्रक्रिया नीट होत नाही. शर्करायुक्त पदार्थ हे पचणे कठीण ठरते. त्यामुळे हे पदार्थ खाऊ नका.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *