[ad_1]

नवी दिल्ली : जर तुम्ही ‘हवाला’ शब्द पहिला तर याच अर्थ एखाद्या गोष्टीवर किंवा कोणावर तरी विश्वास ठेवणे असा होतो. बस हाच विश्वास ‘हवाला व्यवसाय/बिझनेस’चा पायाही आहे. पैशाचा व्यवहार करण्याची ही पद्धत अनेक दशकांपासून प्रचलित आहे. हवाला पद्धतीने पैसे हस्तांतरित करण्याचा अनौपचारिक मार्ग आहे, ज्यामध्ये पैसे प्रत्यक्ष हस्तांतरित केले जात नाहीत तर फक्त भरवशावर चालणारा हा व्यवसाय कोट्यवधी रुपयांचे व्यवहार लवकर आणि टेन्शन फ्री करतो. जगभरातील सरकार आणि एजन्सींच्या नजरेत येऊ नये म्हणून हवालाद्वारे पैशांचे व्यवहार केले जातात.

‘हवाला’ व्यवसायाचा इतिहास
एक काळ असा होता चीनमधून अरब आणि युरोपीय देशांमध्ये ‘सिल्क रूट’ (रेशमी मार्ग) ने व्यवहार व्हायचे. याच मार्गाने भारताचाही व्यापार व्हायचा. त्या काळात व्यापारी उंटावर बसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे आणि वाटेत त्यांना चोर, डाकू यांचा सामना करावा लागायचा. यामध्ये त्यांना अनेकदा पैशाचे नुकसान सहन करावे लागायचे. त्यामुळे एखाद्याच्या पैशाचे रक्षण करण्यासाठी हवाला व्यवसायाचा जन्म झाला.

Breaking : महादेव बेटींग अ‍ॅपबाबत मोठी बातमी , २२ बेकायदेशीर अ‍ॅपसह वेबसाइट ब्लॉक, केंद्रानं का घेतला निर्णय?
‘हवाला’ व्यवसाय कसा चालतो?
हा व्यवसाय पूर्णतः विस्वासावर चालतो, किमान दोन एजंट आणि त्यांचे नेटवर्क असते. समजा तुम्हाला दिल्ली ते चेन्नई येथे सुमारे १०० कोटी रुपयांची रोकड पोहोचवायची आहे. बँकेतून ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला खूप चार्जेस द्यावे लागतील. तर देशातील एजन्सी देखील एवढा पैसा कुठून आला आणि कसा कमावला, असे प्रश्न विचारतील. अशा परिस्थितीत तुम्ही ते त्या व्यावसायिकाकडे पाठवाल ज्याचे नेटवर्क चेन्नईमधील एजंटकडे असेल.

महादेव बुक गेमिंग ॲपचा सर्वेसर्वा सौरभ चंद्राकरची स्टार्ट टू एंड कहाणी, बॉलिवूड स्टार्सना ‘नाचवणारा’ कोट्याधीश
तुम्ही दिल्लीतील एजंटला १०० कोटी रुपये दिले त्या बदल्यात एजंट तुम्हाला एक कोड देईल. हा कोड तुमचा पासवर्ड असेल जो चेन्नईत बसलेल्या एजंटला मिळताच तो तुम्हाला कोणतेही प्रश्न किंवा उत्तर न देता १०० कोटी रुपये देईल. अशा प्रकारे कोणत्याही डोकेदुखी शिवाय तुमच्या पैसे हस्तांतरण पार पडले. यालाच ‘हवाला’ व्यवसाय म्हणतात. या व्यवसायात एजंट एक लाख रुपयांच्या प्रत्येक व्यवहारासाठी काही रक्कम आकारतो जे त्याच्या उत्पन्नाचे साधन आहे.

सहा हजार कोटी हपापा; १० हजार पानी आरोपपत्र, महादेव अॅपप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल
उल्लेखनीय म्हणजे हा संपूर्ण व्यवसाय पूर्णपणे विश्वासावर झाला आहे. रुपया, डॉलर, दिरहम इत्यादी अवैध चलनांचे बहुतांश व्यवहार अशा प्रकारे केले जातात. यामध्ये पैसे पाठवणारा आणि घेणारा यांचा शोध घेणे जवळपास अशक्य असते.

Read Latest Business News

‘महादेव’ ते दाऊदशी कनेक्शन
‘महादेव बेटींग ॲप’ या प्रकरणाच्या तपासात संस्थापक या ऑनलाइन बेटींग ॲपमधून दररोज २०० कोटी रुपयांपर्यंत कमाई करत असल्याचे ईडीला आढळून आले आहे. ॲपचे संस्थापक दुबईत बसून व्यवहार करायचे. त्यामुळे ही कमाई हवालाद्वारे दुबईला जायची आणि दाऊदच्या टोळीतील लोक त्यांना या कामात मदत करायचे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *