[ad_1]

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांची तसेच खासदारांची एक बैठक मुंबईत शुक्रवारी पार पडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत भाजपच्या आमदारांनी सोशल मीडियाचा आक्रमक पद्धतीने वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्याचे समजते. समाधानकारक कामगिरी न करणाऱ्या काही आमदार आणि खासदारांचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कान टोचल्याचेही समजते.मुंबईतील गरवारे क्लब येथे सकाळी नऊ वाजल्यापासूनच आमदार आणि खासदारांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. सुरुवातीला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. लोकसभा निवडणुका जिंकायच्या असतील तर कोणत्या पक्षासोबत युती करायला हवी, कोणत्या पक्षासोबत युती करण्याचे टाळायला हवे, आपल्या उमेदवारांना तिकीट देताना कोणते निकष लावणे गरजेचे आहे याविषयीही चर्चा झाल्याचे समजते.राजकारणात सोशल मीडियाच्या वाढलेल्या प्रभावावर यावेळी चर्चा झाली. त्यामुळे सोशल मीडियाचा आक्रमक पद्धतीने वापर करण्याबाबत संबंधित आमदार तसेच खासदारांना सूचना देण्यात आल्या. विरोधक सोशल मीडियात सक्रिय असताना तुम्ही का सक्रिय नाही, याबाबत काही आमदारांकडे विचारणा करण्यात आल्याचे समजते. एखाद्या राजकीय मुद्द्यावर आपण नॅरेटिव्ह का तयार करू शकत नाही, त्याच्यामध्ये का कमी पडतो याबाबतही वरिष्ठ नेत्यांकडून विचारणा करण्यात आल्याचे समजते. साहजिकच सोशल मीडियावर अधिकाधिक सक्रिय व्हा, विशिष्ट ग्रामीण भागातील आमदारांनी सोशल मीडियाचा वापर करावा, अशा सूचनाही फडणवीस आणि बावनकुळे यांनी दिल्याचे समजते.आमदार-खासदारांशी व्यक्तिश: चर्चायावेळी आमदारांशी व्यक्तिश: चर्चा करून त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आल्याचे समजते. त्यासाठी आमदार तसेच खासदार यांचे रिपोर्ट कार्डही तयार करण्यात आल्याचे समजते. या कार्डनुसारच कोणता आमदार तसेच, कोणता खासदार आपापल्या मतदारसंघांमध्ये कमी पडतो, त्या मागची काय कारण आहेत याबाबतही संबंधितांची चर्चा करण्यात आल्याचे समजते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *