नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्षी २०२४-२४ साठी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यादरम्यान, सीतारामन यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या तर काहींच्या हाती निराशा आली. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री म्हणाल्या की, प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत एक कोटी घरांना दरमहा ३०० युनिट मोफत वीज मिळेल, ज्यामुळे ग्राहकांचे दरवर्षी १५,००० ते १८,००० रुपयांची बचत होईल, असा दावा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी या योजनेची घोषणा केली असून याअंतर्गत गरीब किंवा मध्यमवर्गीय लोकांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात येतील ज्यामुळे पगारदार वीज बिल भरण्याच्या त्रासातून मुक्त होतीलच पण अतिरिक्त विजेची बचतही होऊ शकेल. या योजनेंतर्गत २०२६ पर्यंत ४० हजार मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

योजनेची घोषणा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ही योजना यशस्वी करण्यासाठी मोठी राष्ट्रीय मोहीम राबवण्याची गरज असून सरकारने २०१४ मध्ये सौभाग्य योजना सुरू केलेली ज्यामध्ये घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवून २०२२ पर्यंत ४०,००० मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवलेले. परंतु सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबर २०२३ पर्यंत या योजनेद्वारे केवळ ११,००० मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकली आणि आता या योजनेला चालना देण्यासाठी पंतप्रधान सर्वोदय योजना सुरू करण्यात आली आहे ज्याचा फायदा फक्त गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना होईल.

काय होईल लाभ
योजनेच्या लाभार्थ्यांना कमी वीज बिल येईल आणि वार्षिक १८,००० रुपयांपर्यंत बचत होईल. या योजनेसाठी पात्र लोक घराच्या छताचा वीज निर्मितीसाठी योग्य वापर करू शकतील. तसेच वीज ग्राहकांना सौर पॅनेल बसवण्यासाठी जमीन खरेदी करण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि देशात स्वच्छ ऊर्जेला चालना मिळेल.

सरकारी सेवेत कार्यरत नसलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ मिळेल. तसेच लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे म्हणजे गरीब वर्ग, मध्यमवर्गीय आणि गरजू या योजनेसाठी पात्र ठरतील. अर्जदाराकडे आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, वीज बिल, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो किंवा रेशन कार्ड यांसारखी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

सूर्योदन योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी https://solarrooftop.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यानंतर होम पेजवर Apply पर्याय निवडा. वापरकर्त्याने राज्य आणि जिल्ह्यानुसार सर्व माहिती द्यावी प्रविष्ट करावी आणि वीजबिल क्रमांक दिल्यानंतर वीज खर्चाची माहिती व मूलभूत माहिती, सोलर पॅनलचा तपशील प्रविष्ट करावा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *