[ad_1]

नवी दिल्ली : Flipkart Handling Fees : आजकाल सर्वकाही ऑनलाईन होत असल्याने ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाणही खूप वाढलं आहे. सध्या फ्लिपकार्ट, अॅमेझॉन या साईट्सवरुन खूप शॉपिंग होत आहे. अशातच फ्लिपकार्टने युजर्सवर महागाईचा नवा बोजा टाकला आहे. हाताळणी शुल्क अर्थात हँडलिंग फीसच्या नावाखाली फ्लिपकार्टने अतिरिक्त शुल्क घेण्यास सुरुवात केली आहे. ६००० रुपयांच्या बिलावर वापरकर्त्यांकडून हँडलिंग फी म्हणून ४९ रुपये आकारले जात आहेत. विशेष म्हणजे फ्लिपकार्टकडून विक्री फीसह पॅकेजिंग फी आधीच आकारली जाते. अशा परिस्थितीत, फ्लिपकार्ट युजर्स हँडलिंग शुल्कामुळे खूप संतप्त दिसत आहेत. ट्वीटर म्हणजेच X प्लॅटफॉर्मवर फ्लिपकार्ट युजर्स नाराजी व्यक्त करत आहेत.

ट्वीटर यूजर्स संतापले
अतुल शर्मा याने ट्वीट करत उपहासात्मकपणे म्हटलं आहे की, काही दिवसांत फ्लिपकार्टकडून कर्मचार्‍यांचे पगार शुल्क, सर्व्हर फी, डिलिव्हरी पेट्रोल फी, बॉक्स टॅपिंग फी, अॅप डाउनलोडिंग फी आणि ऑर्डर फीच्या रूपात शुल्क वसूल केले जाऊ शकते.

हँडलिंग फी म्हणजे काय?
हँडलिंग फी म्हणजे असे शुल्क आहे जे चेकआउटच्या वेळी कोणत्याही बिलिंगमध्ये जोडले जाते. हँडलिंग फीमध्ये ऑर्डरची पॅकिंग करणे आणि पाठवणे यांचा खर्च घेतला जातो.

कॅश ऑन डिलिव्हरी शुल्कही आहेच
फ्लिपकार्टकडून हँडलिंग फी लादण्याची बाब नवीन नाही. नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रथमच, फ्लिपकार्टने कॅश ऑन डिलिव्हरीवर हाताळणी शुल्क लागू केले. या अंतर्गत, ५०० पेक्षा जास्त डिलिव्हरी ऑर्डरवर रोख ४० रुपये आकारण्यात आले. तसेच ५०० रुपयांपेक्षा कमी डिलिव्हरीवर ५ रुपये शुल्क आकारण्यात आले.

वाचा : युजर्सचा खाजगी डेटा राहणार सेफ, १० पॉइंट्समध्ये जाणून घ्या काय आहे डिजीटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल?

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *