पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा गावगुंडांची दहशत पाहायला मिळाली आहे. स्थानिक गावगुंडांच्या टोळक्याने किरकोळ वादातून वाईन शॉप चालकावर कोयत्याने वार करून तसेच दगडाने हल्ला केला असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी पुन्हा एकदा डोकेवर काढू लागल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेचे सीसीटीव्ही समोर आले आहेत.
कॅम्पस इंटरव्ह्यूमधून नोकरी; मात्र समाजासाठी कामं करण्याची इच्छा, कठोर संघर्षातून लेकीची उपजिल्हाधिकारी पदी निवड
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड गावातील पूजा वाईन्स या ठिकाणी ही धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. या धक्कादायक घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये देखील कैद झाली आहेत. वाईन शॉपमध्ये बिल घेण्याच्या वादातून स्थानिक गावगुंड आणि वाईन शॉप चालकामध्ये वादावादी झाली. याच वादातून गावगुंडांच्या टोळक्याने सुरुवातीला वाईन शॉप चालकावर तसेच वाईन शॉपमधील कामगारांवर लाथाबुक्याने मारहाण करून दगडाने हल्ला केला. त्यानंतर एका गावगुंडाने त्या ठिकाणी येऊन कोयत्याने वाईन शॉप चालक आणि वाईन शॉपच्या कामगारांवर हल्ला केला आहे.

मला सहकार्य केलं तरच कामं होतील, नाहीतर तुमची कामं करायला मी बांधील नाही : अजित पवार

या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. याप्रकरणी वाईन शॉप चालकाने चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस डोकेवर काढू लागली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हाने देखील वाढत आहेत. अशा घटनावर पोलिसांनी वचक बसवणे गरजेचे आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दहशत निर्माण करण्यासाठी हा प्रकार केला असल्याची माहिती समोर आली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *