[ad_1]

नवी दिल्ली : सोने किंवा सोन्याचे दागिने घ्यायचे असतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारी २०२४ रोजी सोन्याच्या दरात किंचित वाढ होताना दिसली तर, चांदीच्या किमतीत किंचित घट नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षभरात सोन्याने विक्रमी उच्चांकावर मजल मारली तर नविन वर्षातही सोन्याच्या किंमती सर्वसामान्यांचं आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नविन वर्षात म्हणजे २०२४ वर्षात सोन्याचा भाव ७० हजारांवर जाण्याची शक्यता आहे.शेअर बाजारातील अनिश्चितता आणि राजकीय अस्थिरता यांमुळे सोन्याची मागणी वाढते, परिणामी मौल्यवान धातूंच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. तुम्हीपण आज सोने किंवा चांदी खरेदीसाठी घराबाहेर पडणार असाल तर, सोन्या-चांदीची किंमत काय आहे येथे जाणून घ्या.सोने-चांदीचा आजचा भाव कायदेशांतर्गत वायदे बाजारात सोमवारी सोन्याच्या किमतीत प्राथमिक वाढ दिसून येत असून सोमवारी वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत सुरुवातीला वाढ नोंदवली गेली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, फेब्रुवारी २०२४ सोन्याचे फ्युचर्स १३७ रुपये किंवा ०.२२% वाढीसह ६३,३४० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे, एप्रिल २०२४ मालिकेतील सोन्याचे फ्युचर्स १६२ रुपये म्हणजे ०.२५% वाढून ६३,६९३ रुपये प्रति १० ग्रॅम झाले.दुसरीकडे, MCX वर मार्च २०२४ चांदीचे वायदे १२४ रुपये किंवा ०.१७% घसरून ७४,३०६ रुपये प्रति किलोवर व्यापार करत असताना मे २०२४ चांदीचे फ्युचर्स भाव ४८ रुपये किंवा ०.०६% कमी होऊन ७५,४५२ रुपये प्रति किलोवर आले आहेत. याशिवाय सराफा बाजारात वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याच्या दरात स्थिरता दिसून आली. २४ कॅरेट सोन्याची किंमत ६,३९७ रुपये प्रति ग्रॅम तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ५,८७० रुपये प्रति ग्रॅम होती. तर चांदीचा भाव ३,००० रुपयांनी वाढून ७८,६०० प्रति किलो झाला आहे.जागतिक बाजारात सोन्याचा भावकॉमेक्सवर, फेब्रुवारी सोन्याचे वायदे ०.५६% घसरणीसह २,०७१.८० डॉलर प्रति औंस पातळीवर व्यवहार करत होते. तर मार्च चांदीचे वायदे १.४०% घरून २४.०८६ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *