[ad_1]

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्यांवरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा गुंड निलेश घायवाळ याचा फोटो ट्विट केला होता. या मुद्यावरुन विजय वडेट्टीवार यांनी सरकारला प्रश्न विचारले आहेत.

या सरकारनं नवनवीन आयडिया करणं आणि त्यातून पैसा मिळवण्याचा धंदा सरकारनं सुरु केलेला आहे. कायदा व सुव्यवस्था किंवा इतर विषय संपलेले आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेला गुंड मंत्रालयात रील तयार करतो. गुंड निलेश घायवाळ जामिनावर आहे. तो मुख्यमंत्र्यांना भेटतो, मंत्रालयात रील तयार करतो. गुंडांना संरक्षण देणारं आणि गुंडांना पोसणारं हे सरकार आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

जामिनावर बाहेर असलेला आरोपी मुख्यमंत्र्यांना भेटतो, मात्र त्यांना कोण सल्ला देत आहे. मुख्यमंत्र्यांकडे मोठं संख्याबळ असताना त्यांना गुंडांना भेटण्याची गरज का पडत आहे, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला. पक्षफोडीच्या राजकारणानंतर महाराष्ट्राची इज्जत चव्हाट्यावर आणली गेली आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं.
श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवशी ‘वर्षा’वर गुंड, भेट घडवणाऱ्या युवासेना पदाधिकाऱ्याची हकालपट्टी

गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अभिनंदनास पात्र आहेत. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेत्यांनी केली.

उल्हासनगर पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांना अटक, वाद नेमका कशातून सुरु झाला?
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे. पेपरफुटी विरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषणात आपले आयुष्यातील महत्वाचे दिवस घालवत आहे. नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. आणि इकडे सरकार गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहे. हीच का ती “मोदी की गॅरंटी” ? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी सलग दोन दिवस एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेणाऱ्या गुंडांचे फोटो त्यांनी पोस्ट केले.
लडाख, मणिपूर ते एकनाथ शिंदेंच्या फोटोवरुन प्रश्न, मोदींच्या भाषणात या गोष्टी नव्हत्या : संजय राऊत

भुजबळांना समर्थन देणार, ओबीसी म्हणून त्यांची अन् आमची भूमिका एकच; वडेट्टीवारांचा पाठिंबा

Read Latest Maharashtra News And Marathi News



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *