[ad_1]

नवी दिल्ली : श्वानप्रेमी किंवा मांजरप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांसाठी विमा संरक्षण घेऊ शकणार आहात. बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सने पाळीव प्राण्यांसाठी विमा पॉलिसी आणली आहे. विमा कंपनीने पाळीव कुत्रे आणि मांजरांसाठी पाळीव विमा पॉलिसी जारी केली आहे. तुम्ही तुमच्या पाळीव कुत्र्यासाठी किंवा मांजरीसाठी ही पॉलिसी घेऊ शकता. हा विमा प्रत्येक जातीच्या ३५ हून अधिक कुत्रे आणि मांजरांना विमा संरक्षण देतो. विमा वैयक्तिक तसेच गट आधारावर घेतला जाऊ शकतो. तुम्ही हे विमा संरक्षण अल्प मुदतीपासून दीर्घ मुदतीसाठी घेऊ शकता.

विमा कंपनीने या विमा पॉलिसीची रचना अशा प्रकारे केली आहे की व्यावसायिक वापरातील कुत्रे आणि मांजरांना त्याचा लाभ मिळू शकेल. या विमा संरक्षणाद्वारे, तुम्ही तुमच्या पाळीव कुत्र्यासाठी किंवा मांजरीसाठी आजारपणापासून ते चोरीपर्यंत दावा करू शकता.

हिंडेनबर्गने पार बुडवले, एक गौप्यस्फोट आणि तीन अब्जाधीशांचे ₹ ८१,९७,०२,१८,००,००० चे नुकसान
या विमा संरक्षणाद्वारे तुम्ही तुमचा कुत्रा किंवा मांजर सुरक्षित ठेवू शकता. जेव्हा तो आजारी पडला किंवा तो हरवला किंवा चोरीला गेला, तेव्हा तुम्ही त्याचे विमा संरक्षण मिळवू शकता. एवढेच नाही तर या विमा संरक्षणामध्ये तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांच्या लसीकरणाचा खर्चही भरू शकता.

शिक्षणाच्या माहेरघरात खळबळ, डीनने प्रवेशासाठी १६ लाखांची लाच मागितली अन् जाळ्यात अडकला
या पेट पॉलिसीद्वारे, तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांसाठी असे विमा संरक्षण मिळवू शकता, ज्याच्या मदतीने तुम्ही आजारपण, अपघात किंवा नुकसान झाल्यास संपूर्ण खर्च घेऊ शकता. तथापि, यासाठी काही अटी आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. या विम्याचा लाभ घेण्यासाठी पाळीव प्राण्यांनाही वयोमर्यादा आहे. उदाहरणार्थ, पाळीव प्राण्यांचे वय, त्यांची तंदुरुस्ती, त्यांचा वैद्यकीय इतिहास याची विशेष काळजी घेतली जाते.

सूर्यकुमारच्या तुफानात वेस्ट इंडीज कुठच्या कुठे उडाला, तिसरा T-२० जिंकून भारताचे मालिकेत जबरदस्त पुनरागमन

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *