[ad_1]

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी विरोधी पक्षांच्या आघाडीतून प्रादेशिक पक्ष वेगळी भूमिका घेत साथ सोडत असल्याचं चित्र आहे. नितीशकुमार यांच्या जदयूनं पुन्हा एनडीएत जात भाजपसोबत बिहारमध्ये सरकार बनवलं. उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय लोक दलाचे जयंत चौधरी हे देखील एनडीएच्या वाटेवर आहेत. या घडामोडी सुरु असताना एनडीएममध्ये आणखी एका जुन्या मित्रपक्षाचा पुन्हा प्रवेश होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पंजाबमधील शिरोमणी अकाली दलासोबत जागावाटपाबद्दल चर्चा सुरु असल्याची माहिती दिली. एनडीएमध्ये अकाली दलाचा पुन्हा समावेश होण्यासंदर्भातील चर्चा सुरु आहेत, त्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत, असं शाह म्हणाले. अकाली दलानं कृषी कायद्यांच्या मुद्यावरुन २०२० मध्ये एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

अमित शाह यांनी आम्ही आमची विचारधारा जनसंघापासून मानत आलेलो आहे, यापुढेही मानत राहू असं म्हटलं. आमची विचारधारा ज्या पक्षाला मान्य होईल, तो आमच्यासोबत येईल, त्यांचं स्वागत असेल, असं अमित शाह म्हणाले. ते ईटी नॉऊ ग्लोबल बिझनेस समिटमध्ये बोलत होते.

शिरोमणी अकाली दल आणि भाजपची केंद्रात आणि पंजाबमध्ये १९९६ पासून युती होती. केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांच्या मुद्यावरुन अकाली दलानं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारनं २०२१ मध्ये कृषी कायदे देखील मागं घेतले होते. शिरोमणी अकाली दलानं पंजाब विधानसभा निवडणूक बसपासोबत युती करुन लढवली होती. त्यात त्यांना केवळ तीनं जागांवर विजय मिळाला होता.
झारखंडनंतर बिहारचे काँग्रेस आमदार हैदराबादमध्ये, दुसरीकडे जीतनराम मांझींनी वाढवलं नितीशकुमारांचं टेन्शन
बिहारमध्ये जदयू पुन्हा एनडीएसोबत आलेला आहे. दुसरीकडे पंजाबमध्ये भाजपचा शिरोमणी अकाली दलाला पुन्हा सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. आंध्र प्रदेशात भाजपची चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टी आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पार्टीसोबत चर्चा सुरु आहेत.

शरद पवार हयात असतानाच पक्ष काढून घेतला; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया

भाजपचं टार्गेट ४०० पार; शिवसेनेइतका जुना मित्र पुन्हा NDAत परतणार? चर्चा, बैठकांना जोर चढला
अमित शाह यांनी आम्ही कायम आघाडीधर्म पाळलेला असल्याचं म्हटलं. आम्ही कोणत्याही मित्रपक्षाला एनडीएतून बाहेर जाण्यास सांगितलं नाही. काही राज्यांमध्ये आमच्याकडे अधिक जागा असून देखील मुख्यमंत्रिपद मित्रपक्षांना दिल्याचं अमित शाह म्हणाले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *