[ad_1]

नवी दिल्ली : वाढलेल्या महागाईच्या काळात स्वतःचे घर घेणे विशेषतः मोठ्या शहरांमध्ये कठीण झाले आहे. घरांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून आपल्या घराचे आर्थिक नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी गृह विमा घेणे अत्यंत आवश्यक आहे. घराचा विमा काढणे हा अतिशय शहाणपणाचा निर्णय आहे. होम इंश्युरन्स किंवा घराचा विमा काढण्याबाबत बरेच लोक गोंधळलेले असतात. जसे तुम्ही घडीचा किंवा आरोग्य विमा घेता त्याचप्रमाणे घराचाही विमा असतो.

नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान किंवा चोरी यासारखी कोणतीही समस्या माहिती दिल्याशिवाय येतात. अशा स्थितीत तुमचे घर सुरक्षित ठेवण्यासाठी गृहविमा अत्यंत आवश्यक आहे. गृह विम्यामध्ये कोणतीही दुर्घटना, नैसर्गिक आपत्ती किंवा चोरीचा समावेश होतो. त्यामुळे घर घेण्यासोबत घराचा विमा काढणेही फायद्याचे गणित आहे. जेव्हा तुम्ही घराचा विमा काढता तेव्हा तुम्ही अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. चला, घरचा विमा घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

योग्य वैद्यकीय विमा पॉलिसी कशी निवडावी किती रकमेचे आरोग्य विमा संरक्षण हवे
गृह विम्याचे प्रकार
गृह विम्याचे दोन प्रकार असतात – पहिला बिल्डिंग इन्शुरन्स ज्यामध्ये घर शारीरिकदृष्ट्या कव्हर केले जाते आणि दुसरा सामग्री विमा. यामध्ये घराला भौतिक तसेच घरात ठेवलेल्या समानवरही कव्हर मिळतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही विमा खरेदी करता तेव्हा तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

विमा कंपनीच्या फसवणुकीला किंवा गैरप्रकाराची तक्रार कुठे करायची? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
विमा संरक्षण
तुम्ही निवडलेल्या पॉलिसीत तुम्हाला किती कव्हरेज मिळत आहे याकडे लक्ष ठेवले पाहिजे. घरात ठेवलेल्या वस्तूंच्या आधारे तुम्ही विम्याची निवड करू शकतात. तसेच गृह विमा उर्वरित विम्याच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे.

पॉलिसींची तुलना करा
तुम्ही कधी कोणतीही पॉलिसी डोळे बंद करून घेऊ नका. नेहमी इतर कंपन्यांशी गृह विम्याची तुलना करू शकता ज्यात प्रीमियमसह फीचर्सकडे लक्ष दिले पाहिजे.

वाहनविमा काढताना ही काळजी घ्या!

अटी व शर्ती वाचा
जेव्हा तुम्ही कोणताही विमा खरेदी करता तेव्हा तुम्ही त्याच्या अटी व शर्ती तपशीलवार वाचले पाहिजेत. गृह विमा कंपनी काही मर्यादा घालतात, त्यामुळे जर तुम्ही ते काळजीपूर्वक वाचले तर तुम्हाला भविष्यात दावा करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

पुनरावलोकन करा
कोणताही विमा खरेदी करण्यापूर्वी तुम्ही सर्वप्रथम त्याचे पुनरावलोकन (रिव्यू) केले पाहिजे. आपण सोशल मीडियावरील पुनरावलोकने देखील वाचू शकता. तुम्ही घेत असलेला गृहविमा तुमच्या गरजांसाठी योग्य आहे की नाही? हे तुम्ही तपासा आणि मगच निर्णय घ्या.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *