ब्लोमफॉन्टेन : मुशीर खानच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर भारताने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडवर दमदार विजय मिळवला. भारताेन प्रथम फलंदाजी करताना मुशीरच्या शतकाच्या जोरावर २९५ धावांचा डोंगर उभारला. भारताच्या २९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडचा डाव फक्त ८१ धावांत आटोपला आणि २१४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे भारताला या युवा वर्ल्ड कपच्या सुपर-६ फेरीत विजयाने सुरुवात करता आली आहे. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या दिशेने ठोस पाऊल उचलले आहे.न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य दिले होते. भारताला यावेळी अर्शीन कुलकर्णीच्या रुपात पाचव्याच षटकात मोठा धक्का बसला. अर्शीनला यावेळी ९ धावा करता आल्या. त्यानंतर मुशीर खान फलंदाजीला आला आणि त्याने सामन्याचे रुप बदलून टाकले. मुशीरने सुरुवातीपासून दमदार फलंदाजी करायला सुरुवात केली. यावेळी मुशीरला चांगली साथ मिळाली ती सलामीवीर आदर्श सिंगची. यावेळी आदर्श सिंगने ६ चौकारांच्या जोरावर ५२ धावांची खेळी साकारली. आदर्श बाद झाला तरी मुशीर हा न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर प्रहार करतच होता. मुशीरने यावेळी या स्पर्धेतील आपले दुसरे शतक पूर्ण केले. या सामन्यात मुशीरने १२६ चेंडूंत १३ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर १३१ धावांची धमाकेदार खेळी साकारली. मुशीरच्या या खेळीच्या जोरावरच भारतीय संघाला यावेळी २९५ धावा करता आल्या.भारताच्या २९६ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवातच वाईट झाली. कारण न्यूझीलंडला यावेळी पहिल्याच चेंडूवर भारताचा वेगवान गोलंदाज राज लिंबानीने धक्का दिला. राजने पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडचा सलामीवीर टॉस जोन्सला बाद केले. त्यानंतर न्यूझीलंडचे फलंदाज एकामागून एक बाद होत राहीला. यावेळी राजने दोन बळी मिळवले. राजपेक्षा या सामन्यात गोलंदाजीत आपली छाप पाडली ती स्वामी पांडेने. या सामन्यात पांडेने १९ धावांत चार बळी बाद केले आणि भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळेच भारताला यावेळी न्यूझीलंडच्या संघाला ८१ धावांवर ऑल आऊट करता आले. त्यामुळे भारताने या सामन्यात २१४ धावांनी दणदणीत विजय मिळवला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *