[ad_1]

मुंबई : नवीन युगातील कंपन्यांच्या IPO मध्ये गुंतवणूक केलेल्या मामाअर्थची मूळ कंपनी होनासा कंझ्युमरच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. अलीकडेच शेअर बाजारात सूचिबद्ध झालेला स्टॉक इश्यू किमतीच्या खाली घसरले आहेत. तथापि जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल किंवा गुंतवणूक करून कमाई करण्यासाठी शेअर्सच्या शोधात असाल तर तुम्ही विदेशी ब्रोकरेज हाऊस जेफरीजच्या सल्ल्याने गुंतवणूक करू शकता.

जेफरीजने या ब्रोकरेज फर्मने अलीकडेच शेअर बाजारात सूचिबद्ध झालेल्या होनासा कंझ्युमर लिमिटेडच्या शेअर्सवर खरेदीचे मत दिले आहे. जेफरीजने म्हटले की या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करण्याची क्षमता आहे.

Share Market: ​सुझलॉनच्या शेअरमध्ये चौहेर खरेदी, स्टॉकने घेतली पुन्हा जोरदार उसळी; पुढे काय, फायदा होईल?
होनासा कंझ्युमरचे शेअर्स
७ नोव्हेंबर २०२३ रोजी होनासा कन्झ्युमर लिमिटेडचा आयपीओ स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) कंपनीचे शेअर्स इश्यू किमतीपेक्षा फक्त ६ रुपये जास्त किमतीने लिस्ट झाले. तर पहिल्या दिवशी बाजार बंद होताना शेअर ३३७ रुपयांवर बंद झाला, परंतु लिस्टिंगच्या दोन दिवसानंतर स्टॉक ५% हून अधिक पडझडीसह इश्यू किमतीच्या खाली घसरला.

मामाअर्थची मूळ कंपनी होनासा कन्झ्युमर लिमिटेडच्या शेअर्सनी लिस्टिंगपासून गुंतवणूकदारांची निराशा केली. कंपनीचे शेअर्स ३२४ रुपयांवर लिस्ट झाले, पण यानंतर विक्रीच्या दबावामुळे शेअर्स २५६ रुपयांवर आपटले. तथापि विदेशी ब्रोकरेजच्या सल्ल्याने पुन्हा एकदा शेअर्सनी उसळी घेतली आणि गुरुवारी शेअर्स ७% हून अधिक उडी घेत ३२३ रुपयांच्या पातळीवर पोहोचले.

शेअर बाजारात टाटांच्या शेअरची चलती, फारशी चर्चा न झालेल्या स्टॉकने दिले बंपर रिटर्न्स; काय आहे कारण?
होनासा कंझ्युमरवर ब्रोकरेज बुलिश
ब्रोकरेज फर्म जेफरीजला वित्तीय वर्ष २३-२६ मध्ये चांगल्या मार्जिनसह होनासा कंझ्युमरची वार्षिक २७% वाढ अपेक्षित असून प्रगत इंटरनेट-प्रथम फ्रेंचायझी म्हणून कंपनीची महत्त्वाची भूमिका आहे. याव्यतिरिक्त, होनासाला आपल्या कमाईपैकी एक तृतीयांश ऑफलाइन व्यवसायातून मिळवते.

IPO मुळे पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा हिरमोड, बाजारात ‘या’ कंपनीचे फ्लॅट लिस्टिंग; आता पुढे काय?
जेफरीजने दिले नवीन लक्ष्य
दरम्यान, ब्रोकरेज फर्मने होनासा कंझ्युमरच्या शेअरला ‘बाय’ रेटिंगसह ५२० रुपयांची नवीन लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी होनासा शेअर्स २५६ रुपयांच्या पातळीवर घसरले, तेव्हा जेफरीजने सध्याच्या पातळीपासून या शेअरमध्ये १०३ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली. यानंतर कालच्या स्तरावरून शेअर्सनी उडी घेतली आणि ७% वाढून ३२३ रुपये प्रति शेअरवर बंद झाले.

Read Latest Business News

जेफरीज म्हणाले की, होनासाची मुख्य उत्पादने केसांची निगा, त्वचेची निगा, सौंदर्यप्रसाधने आणि इतर वस्तू आहेत, ज्याची मागणी बाजारात झपाट्याने वाढत आहेत. लक्षात घ्या की होनासा कंझ्युमरचा आयपीओ ३१ ऑक्टोबर रोजी खुला झाला आणि यामध्ये प्रति शेअर किंमत ३०८-३२४ रुपये निश्चित झाली होती. तथापि लिस्टिंग केवळ ४% उडी घेतली मात्र, त्यानंतर शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला.

(Disclaimer: येथे शेअर्सबाबत दिलेली माहिती ब्रोकरेज हाऊसच्या सल्ल्यावर आधारित आहे. शेअर्समधील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते, त्यामुळे तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन तुमच्या कोणत्याही नुकसानीस जबाबदार नाही.)

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *