[ad_1]

नवी दिल्ली : बँकिंगच्या जमान्यात जवळपास प्रत्येकाचे बँक खाते आहे. चालू खाते आणि बचत खाते अशी प्रामुख्याने दोन प्रकारची बँक खाती असतात. बहुतेक लोकांचे बँकेत बचत खाते असले तरी या बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक राखणेही आवश्यक असते. जर तुम्ही असे न केल्यास बँक तुमच्यावर दंडही आकारू शकते. बँकांची किमान शिल्लक मर्यादा असते, ज्याची देखभाल करणे आवश्यक आहे. ही किमान शिल्लक बँकेनुसार वेगवेगळी असते.

शून्य शिल्लक (झिरो बॅलेन्स) खाते म्हणजे काय?
अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना शून्य शिल्लक बँक खात्याची सुविधाही प्रदान करतात ज्यात तुम्हाला कोणतीही शुल्लक राखण्याची गरज नाही. बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटनुसार शून्य शिल्लक खाते म्हणजे जेथे वापरकर्त्यांना कोणतीही किमान शिल्लक राखण्याची गरज नाही. अशा खात्यांमध्ये सहसा विनामूल्य व्यवहार आणि पैसे काढण्याची मासिक मर्यादा असते. तुमचे एकूण व्यवहार मूल्य किंवा पैसे काढण्याची संख्या या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास बँक व्यवहार पद्धतीनुसार तुमच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारू शकते. वेगवेगळ्या बँकांमधील किमान शिल्लक निकष तपासून घेऊया.

US Bank Crisis: अमेरिकेत पुन्हा खळबळ उडाली, शेअर बाजारात हाहाकार; मूडीजने दिली चेतावनी
SBI किमान शिल्लक
मार्च २०२२ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांच्या मूळ बचत खात्यावरील सरासरी मासिक शिल्लक काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी SBI खातेधारकांना त्यांच्या खात्यात सरासरी मासिक तीन हजार रुपये, दोन हजार रुपये किंवा एक हजार रुपये शिल्लक ठेवावे लागत होते. तसेच ही शिल्लक त्यांच्या शाखेनुसार ठेवावी लागणार होती.

HDFC बँक किमान शिल्लक
एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार बचत खात्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक असून शहरी भागातील शाखांसाठी किमान शिल्लक निकष रुपये १० हजार रुपये किंवा एक लाख रुपयांची एफडी किंवा पाच हजार रुपयांची सरासरी मासिक शिल्लक किंवा ५० हजार रुपयांची एफडी तर निमशहरी शाखेसाठी तीन महिन्यांसाठी २५०० रुपये आहे.

ग्राहकांसाठी मोठी बातमी! पाच दिवसांच्या कामकाजाचा आठवडा IBA कडून मंजूर, बँकेच्या वेळा बदलणार
आयसीआयसीआय बँक
ICICI बँकेतील नियमित बचत खात्यासाठी सरासरी किमान शिल्लक निकष १० हजार रुपये आणि सेमी-अर्बन शाखांसाठी पाच हजार रुपये आणि ग्रामीण भागातील शाखांसाठी दोन हजार रुपये आहेत.

कॅनरा बँक
या बँकेच्या ग्राहकांची सरासरी मासिक शिल्लक शाखांमध्ये दोन हजार रुपये, निमशहरी भागात एक हजार आणि ग्रामीण भागात ५०० रुपये आहे.

Bank Locker: लॉकरची चावी हरवली तर काय? डुप्लिकेट चावी मिळणार की लॉकर तोडावे लागेल?
PNB किमान शिल्लक
पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी ग्रामीण शाखांमध्ये एक हजार, निमशहरी भागात दोन हजार रुपये आणि मेट्रो शहरांमध्ये पाच ते १० हजार रुपये किमान शिल्लक निकष आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *