[ad_1]

नवी दिल्ली: सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत आले आणि त्यांनी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांचा समाचार घेतला. जेव्हा जेव्हा विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला तेव्हा तेव्हा आमचे म्हणजेच एनडीए आणि भाजपचे भले झाले आहे. म्हणून तुम्ही २०२८ मध्ये पुन्हा एकदा अविश्वास प्रस्ताव घेऊन या, अशा शब्दात मोदींनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.

मोदींनी सांगितले सिक्रेट

मोदींनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. विरोधकांकडून आम्हाला सिक्रेट वरदान मिळाले आहे. हे लोक (विरोधक) ज्या लोकांचे वाईट चिंतितात त्यांचे भलेच होते. हे तुम्हाला मिळालेले फार मोठे वरदान आहे. हे मी ३ उदाहरणे देऊन सिद्ध करतो. या लोकांनी देशातील बँकिंग क्षेत्राचे वाटोळे होईल असे म्हटले होते. त्यासाठी विदेशातून लोकांना आणले गेले. पण प्रत्यक्षात झाले उटले. सरकारी बँकांचा दुप्पटीने वाढला. दुसरे उदाहरण म्हणजे, सरंक्षण क्षेत्रातील हेलिकॉप्टर तयार करणारी कंपनी HAL होय. ही कंपनी बंद होणार आणि तेथील कामगारांच्या नोकऱ्या जातील असे सांगितले गेले. पण आज HAL एका नव्या उंचीवर पोहोचले आहे. तिसरे उदाहरण LICचे आहे. LICबद्दल काय काय बोलले गेले. देशातील गरीब लोकांचा पैसा उडत आहे, त्यांच्या कष्टाचे पैसे पाण्यात गेले असे बोलले गेले. पण आज LIC आणखी मजबूत झाली आहे.

मोदी म्हणाले…

> आम्ही जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे. पण जगात भारताच्या प्रतिमेला डाग लागेल यासाठी अजूनही काही जण प्रयत्न करत आहेत. पण जगालाही भारताचं महत्त्वं कळलं आहे आणि भारतावरील जगाचा विश्वास वाढत आहे- पीएम मोदी

> PM मोदींचे लोकसभेत भाषण सुरू; अधीर रंजन चौधरींना बोलण्याची संधी मिळाली, पण अधीरबाबूने गुड का गोबर कर दिया- पीएम मोदींचा टोला

> ज्यांचे स्वतःचे हिशेब बिघडले आहेत. तेच आता आमच्याकडे हिशेब मागत आहेत- पीएम मोदी

> प्रत्येकवेळा विरोधकांनी देशाला निराशाशिवाय काही दिलं नाही- पीएम मोदी

> देशापेक्षाही विरोधकांसाठी पक्ष मोठा आहे, हे अनेक विरोधी पक्षांच्या वर्तनावरून दिसून आलं. यामुळे गरीबांच्या भूकेची नाही तर सत्तेची भूक विरोधकांच्या डोक्यात भरलेली आहे. विरोधकांना फक्त आपल्या राजकीय भवितव्याची चिंता आहे- पीएम मोदी

> अनेक विधेयकं होती, त्यावर चर्चा करण्याची गरज होती. पण विरोधकांना यात रूची नाही. त्यांना फक्त राजकारणात रस आहे- पीएम मोदी

> ५ वर्षे दिली तरीही विरोधकांची तयारी नाही- पीएम मोदी

> २०१८मध्येही विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. यानंतर २०१९च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला- पीएम मोदी

> परमेश्वराने विरोधकांना बुद्धी दिली आणि त्यांनी अविश्वास प्रस्ताव मांडला. हा सरकार विरोधातला अविश्वास नाही, तर त्यांच्याच विरोधातला आहे- पीएम मोदी

> देशाच्या जनतेने आमच्यावर सातत्याने विश्वास ठेवला. याबद्दल जनतेला कोटी कोटी धन्यवाद देतो- पीएम मोदी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *