बेनोनी : भारताने १९ वर्षांखालील वर्ल्ड कपच्या फायननलची दमदार सुरुवात केली आहे. भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या धावांना लगाम लावला आणि त्यामुळेच त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत २५३ धावा करता आल्या. त्यामुळे भारताच्या गोलंदाजांनी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आता भक्कम पाया बनवल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतासाठी हे आव्हान कठीण नक्कीच नाही. त्यामुळे आता ते आता २५४ धावांचा पाठलाग कसा करतात ते महत्वाचे आहे.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्विकारली. पण यावेळी भारताने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीपासून वरचढ होण्याची संधी दिली नाही. भारताचा वेगवान गोलंदाज राज लिंबानीने सॅम कोंटासला शून्यावर बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर भारताने अचूक गोलंदाजी केली आणि त्यांना डोके वर काढू दिले नाही. ऑस्ट्रेलियाच्या हरजस सिंगने तीन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५५ धावांची सर्वाधिक खेळी साकारली. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांचे अर्धशतक हुकले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ह्युज बेवगेन हा ४८ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर हॅरी डिक्सन हा ४२ धावांवर बाद झाला. त्यानंतर ऑलिव्हर पीकने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि नाबाद ४६ धावा केल्या. भारताकडून यावेळी राज लिंबानीने भेदस गोलंदाजी केली. लिंबानीने १० षटकांत ३८ धावा देत तीन फलंदाजांना बाद केले. लिंबानीला यावेळी चांगली साथ दिली ती नमन तिवारीने. नमनने यावेळी दोन फलंदाजांना बाद केले. सौमी पांडे आणि मुशीर खान यांनी यावेळी प्रत्येकी एक बळी मिळवला.

मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद पांड्याला, पुणेकरांच्या प्रतिक्रिया काय?

बड्या स्पर्धांच्या बाद फेरीचे सामने कसे खेळावेत याचे धडे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाकडून घ्यावेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पाकिस्तानच्या हातातोंडाशी आलेला विजय हिरावून घेत ऑस्ट्रेलियाने १९ वर्षांखालील वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अंतिम फेरीतील भारताचे आव्हानसाठीही सज्ज आहोत, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ह्यू वीबगेन आत्मविश्वासाने म्हटले होते. ‘भारताचा सामना करणे सोपे नसेल हे आम्ही जाणतो. तो दर्जेदार संघ असून सहज हार मानत नाही. मात्र आम्हालाही असेच आव्हानात्मक प्रतिस्पर्धी आवडतात. आव्हानात्मक प्रतिस्पर्ध्याची दोन हात करणे म्हणजे खेळाडूंच्या गुणवत्तेला वाव. त्यामुळे या अंतिम फेरीची उत्सुकता आहे’, असे वीबगेनने नमूद करतोSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *