[ad_1]

कोलंबो: आशिया चषकानंतर वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज होत आहे. या दोन्ही मोठ्या टूर्नामेंटमध्ये भारताचे दुखापतग्रस्त असलेले महत्त्वाचे खेळाडू संघात परतले आहेत. त्यामुळे भारतीय संघाला थोडा दिलासा मिळाला आहे. पण आशिया चषकादरम्यान पुन्हा एकदा श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यापूर्वी रोहित शर्माने ही माहिती दिली आहे.

आशिया चषकात दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना जोरदार होईल अशी अपेक्षा होती मात्र या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला. दुखापतीनंतर आशिया चषक संघात पुनरागमन करणारा चौथा क्रमांकाचा महत्त्वाचा फलंदाज श्रेयस अय्यरला दुखापत झाली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक करण्यासाठी आलेल्या कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, श्रेयस अय्यरला सराव करताना पाठीच्या दुखापतीचा थोडा त्रास झाल्याने तो प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसणार नाही. अय्यर पाकिस्तान आणि नेपाळविरुद्धच्या आशिया कपमध्ये खेळण्यासाठी आला होता. केवळ दोन सामने खेळल्यानंतर दुखापत होणे ही चिंतेची बाब आहे.

केवळ दोन सामने खेळल्यानंतर दुखापती होणं यामुळे श्रेयसने सर्वांना पुन्हा धक्का दिला आहे. श्रेयसची ही पूर्वीची दुखापत पुन्हा डोकं वर काढतेय की काय अशी भीती आता पुन्हा सतावू लागली आहे. चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर हा वनडेमधील एक जबरदस्त फलंदाज आहे. अनेक सामन्यांमध्ये त्याने शानदार खेळीदेखील केल्या आहेत. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने आता केएल राहुलला १७२ दिवसानंतर वनडे खेळण्याची संधी मिळाली आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

केएल राहुलचे अखेरीस टीम इंडियात पुनरागमन

टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरचा महत्त्वाचा भाग मानला जाणारा केएल राहुल तब्बल ६ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. आयपीएलच्या १६व्या मोसमात मांडीचा त्रास झाल्याने राहुल बराच काळ क्रिकेटच्या मैदानाबाहेर होता. आशिया चषक स्पर्धेतील गट सामन्यांपर्यंत त्याला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित करण्यात आले नव्हते. श्रेयस अय्यर पाकिस्तानविरुद्ध सुपरफोरमध्ये अचानक अनफिट झाल्यानंतर आता त्याचा थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

केएल राहुलने आतापर्यंत त्याच्या वनडे कारकिर्दीत चौथ्या क्रमांकावर ७ डाव खेळले आहेत. यामध्ये त्याने ४०.१७ च्या सरासरीने एकूण २४१ धावा केल्या आहेत. या महत्त्वाच्या सामन्यात राहुलच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा नक्कीच असतील.

भारताची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *