मुंबई : ऑनलाइन पेमेंट ॲप पेटीएमच्या अडचणी वाढत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेला क्रेडिट व्यवहार आणि कोणत्याही प्रकारच्या ठेवी घेण्यास बंदी घातली ज्याचा परिणाम कंपनीच्या शेअरवरही दिसून आला तर ग्राहकही गोंधळले. या सर्व विवादादरम्यान पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी दिल्ली अर्थमंत्र्यांची भेट घेतली आणि पेटीएम समस्या हाताळणे सर्वस्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) काम असून या प्रकरणाशी सरकारचा सध्या काहीही संबंध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.

Paytm Payments Bank च्या लाखो ग्राहकांसाठी मदतीला धावून आली SBI, १ मार्चपासून इथे मिळेल सुविधा

वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी यांनी बुधवारी याप्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले आहे की पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (पीपीबीएल) एक लहान आर्थिक एकक आहे. कोणतीही पद्धतशीर स्थिरता चिंता नाही. नियमांचे पालन न करण्यामुळे आरबीआयने PPBL विरुद्ध अनेक पावले उचलली ज्यामुळे २९ फेब्रुवारीनंतर ठेवी, प्रीपेड उपकरणे व ई-वॉलेटशी संबंधित कोणतीही सेवा प्रदान करण्याची परवानगी दिली जाणार नसून कंपनीला नवे ग्राहक जोडण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.

जोशी म्हणाले की, ‘ही नियामकाने केलेली कारवाई आहे. आरबीआय बँकांचे नियमन करतात. पेटीएमवर कारवाई करण्याबाबत सरकारने आतापर्यंत काहीही केलेले नाही. आमचा विश्वास आहे की ग्राहक आणि अर्थव्यवस्थेच्या एकूण हितासाठी आरबीआयने कारवाई केली असेल.’ याशिवाय पेटीएमच्या पेमेंट एग्रीगेटर उपकंपनीमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीबाबत चीनकडून परवानगी मागितल्याचेही त्यांनी म्हटले.

अर्थमंत्री सीतारामण यांच्यासोबत १० मिनिटांची भेट आणि Paytmचा शेअर बनला रॉकेट, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
सरकारचा हस्तक्षेप करण्यास नकार
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शर्मा यांची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत सुमारे १० मिनिटे बैठक चालली आणि रिझर्व्ह बँकेच्या कारवाईत सरकारची कोणतीही भूमिका नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. याशिवाय, पेटीएमला RBI सोबत समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले असून शर्मा यांनी नियामक चिंतेवर चर्चा करण्यासाठी काल आरबीआय अधिकाऱ्यांचीही भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

पेटीएमचा असा निघाला दम, या कारनाम्यांमुळे अडचणी वाढल्या, पाहा नेमकं कुठे चुकलं
पेटीएमवर कारवाईचा बडगा
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या आठवड्यात पेटीएम बँकेवर कारवाई केली. पेटीएम पेमेंट्स बँकेच्या हजारो ग्राहकांनी KYC दस्तावेज जमा केलेले नव्हते. तर काही प्रकरणांमध्ये हजारो ग्राहकांना नोंदणीकृत करण्यासाठी एक सिंगल ओळख दस्तावेजाचा वापर केला आणि रेग्यूलेटरी लिमिटच्या पुढे जाऊन लाखो रुपयांचे ट्रांझेक्शन मिनिमम KYC अकाउंटद्वारे केले, ज्यामुळे मनी-लॉन्ड्रिंगची चिंता वाढली.

Read Latest Business NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *