[ad_1]

अहमदनगर: दरवर्षी भाव नसल्याने रस्त्यावर फेकून दिल्या जाणाऱ्या टोमॅटोने आता कमाल केली आहे. टोमॅटोने गगनाकडे झेप घेतल्याने अनेक शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. नगरमधील एक शेतकरी तर अवघ्या एका महिन्यात लखपती झाला आहे. नगर तालुक्यातील भातोडी येथील बबन धलपे या शेतकऱ्याने टोमॅटोच्या शेतीतून ही कमाल केली आहे.

धलपे यांची एकूण ८ एकर शेती आहे. त्यापैकी दीड एकर शेतीवर त्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून ते नियमित टोमॅटोची लागवड करीत आहेत. भाव वाढो किंवा कमी होवो टोमॅटो शेतीवर त्यांची निष्ठा कायम राहिली आहे. धलपे यांनी एप्रिल महिन्यात टोमॅटोची लागवड केली. उन्हाळ्यात टोमॅटोचे दर एक रुपया किलोपर्यंत घसरले होते. मात्र धलपे यांना जुलैपासून टोमॅटो मिळण्यास सुरूवात झाली. त्यावेळी टोमॅटोचे दर प्रतिकिलोला शंभरच्या जवळपास पोहोचले होते. मुंबई – पुण्यात तर हे दर दोनशेच्या घरात गेले होते. सुरूवातीला धलपे यांना ८० रूपये प्रतिकिलोचा भाव मिळाला . त्यानंतर भावाने उसळी मारून शंभरी पार केली. दोन-तीन दिवसाआड त्यांना १४० कॅरेट इतके टोमॅटोचे उत्पादन मिळू लागले.

एका कॅरेटची क्षमता २० किलो टोमॅटोची असते. म्हणजे दर दोन दिवसाला धलपे यांना अडीच ते तीन हजार इतके टोमॅटोचे उत्पादन मिळाले. अजूनही १५ दिवस उत्पादन मिळणार आहे. दिड महिन्यातच त्यांना जवळपास ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे टोमॅटोच्या पिकांसाठी लागवड, खत, औषध फवारणी, तारेचे कुंपन असे मिळून २ ते अडीच लाखांचा खर्च आला. टोमॅटोच्या लागवडीपासून उत्पादनापर्यंत त्यांचे सारे १२ लोकांचे कुटुंब त्यांना शेतीकामात मदत करीत आहे. पाणी उपलब्ध असल्याने त्यांना पाणीटंचाईची समस्या भेडसावली नाही. त्यामुळे पीक ही जोमात आहे.

लालसोना टोमॅटोमुळे शेतकरी मालामाल, २ एकरात कमी खर्च करून लाखोंचे उत्पन्न, राज्यात चर्चा!

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *