[ad_1]

माउंट माउंगानुई : केन विल्यमसन हा न्यूझीलंड क्रिकेटमधील जणू सुपरमॅनच आहे. त्याने ३१ कसोटी शतके केली आहेत. न्यूझीलंडमधील एकही फलंदाज त्याच्या जवळपास नाही. सर्वाधिक कसोटी शतकांच्या न्यूझीलंड फलंदाजांच्या क्रमवारीत दुसरा असलेल्या रॉस टेलरने १९ शतके केली आहेत. केन विल्यमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या क्रिकेट कसोटीत दुसऱ्या डावातही शतक केले. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ५२८ धावांची आघाडी घेतली आहे. विल्यमसन हा कसोटीच्या दोन्ही डावात शतक केलेले न्यूझीलंडचा पाचवा फलंदाज आहे. यापूर्वी ही कामगिरी ग्लेन टर्नर, जेफ हॉवर्थ, अँड्र्यू जोन्स आणि पीटर फुल्टन यांनी केली आहे. विल्यमसनच्या १०९ धावांमुळे न्यूझीलंडने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर ४ बाद १७९ अशी मजल मारली आहे. त्याने १३२ चेंडूंत १२ चौकार आणि एका षटकारासह ही खेळी केली. त्याने पहिल्या डावात शतकासाठी २४१ चेंडू घेतले होते, तर त्याने दुसऱ्या डावात तीन आकडी मजल केवळ १२५ चेंडूतच मारली होती. कारकीर्दीतील ३१वे कसोटी शतक केलेला विल्यमसन नील ब्रँडच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाला. कारकीर्दीत केवळ तिसऱ्यांदा विल्यमसन या प्रकारे बाद झाला आहे. दरम्यान, पहिल्या डावात द्विशतक केलेला राचिन रविंद्र दुसऱ्या डावात केवळ १२ धावाच करू शकला. केनच्या शतकांमुळे आता न्यूझीलंडचा संघ सुस्थितीत आला आहे. कारण आता त्यांच्याकडे तिसऱ्या दिवशीच पाचशेपेक्षा जास्त धावांची आघाडी आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी त्यांनी भक्कम पाया रचल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडचा संघ किती धावांनी विजय मिळवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.सर्वाधिक वेगवान ३१ कसोटी शतकेखेळाडू डावसचिन तेंडुलकर १६५स्टीव स्मिथ १७०केन विल्यमसन १७०सक्रीय खेळाडूंमधील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकेखेळाडू शतकेविराट कोहली ८०डेव्हिड वॉर्नर ४९ जो रुट ४६स्टीव स्मिथ ४४केन विल्यमसन ४४ खेळ आकड्यांचा६ – केन विल्यमसनने गेल्या दहा कसोटी डावात केलेली शतके

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *