नवी दिल्ली : बचत मुदत ठेव FD (फिक्स्ड डिपॉझिट) वर मिळणाऱ्या व्याजाबाबत अनेक लोकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण होतात, विशेषतः कर दायित्वाशी संबंधित असतात. बहुतेक पगारदार लोक आपल्या कष्टाची कमाई अशा साधनांमध्ये गुंतवतात जिथे कमी जोखीम आहे. अशा परिस्थितीत मुदत ठेव (एफडी) किंवा आवर्ती ठेव (आरडी) वरील व्याजातून उत्पन्न मिळवण्याचा फायदेशीर आणि जोखीममुक्त पर्याय आहे. तसेच काही लोक कर्जावर पैसे कमावतात म्हणजे इतरांना कर्ज देतात आणि त्यावर व्याज आकारतात जी देखील उत्पन्नाचे साधन आहे. जेव्हा असे उत्पन्नाचे स्रोत असतात तेव्हा त्यांच्यावर कर किंवा टीडीएसचा विशेष नियम असतो, या विशेष नियमांनुसारच कर दायित्व बनते.

Tax Saving Ideas: पत्नीला घरभाडे देऊन मिळवू शकता HRA वर टॅक्स सवलत, जाणून घ्या काय आहे नियम
बचत खात्याच्या व्याजावर टॅक्स
आयकर कायद्याच्या कलम 80TTA नुसार एका आर्थिक वर्षात बचत खात्यातून मिळणारे १०,००० रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त आहे. कर कपातीची ही मर्यादा प्रत्येक बँक खात्यासाठी वेगळी नाही, परंतु सर्व बचत खात्यांमधून व्याजाच्या रूपात होणाऱ्या कमाईचा समावेश आहे. ही कर वजावट ६० वर्षांखालील लोकांसाठी आणि HUF म्हणजेच हिंदू अविभक्त कुटुंबासाठी असून बचत खात्यावरील व्याज १०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यास टॅक्स लागू होतो.

याशिवाय करदात्याला सर्व बचत खात्यांमधून मिळालेल्या व्याजाची रक्कम ITR मध्ये ‘इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नात’ दाखवणे बंधनकारक आहे. व्याजाची रक्कम तुमच्या एकूण उत्पन्नात जोडली जाईल आणि टॅक्स स्लॅबनुसार तुम्हाला कर भरावा लागेल.

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली, निवडणुकीआधी सरकार करू शकते मोठी घोषणा; DA इतका वाढणार
FD मधून मिळणाऱ्या कमाईवर कर
मुदत ठेवी म्हणजेच FD मधून मिळणारे व्याज पूर्णपणे कराच्या कक्षेत आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणजे ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक बचत खाते आणि FD मधून मिळणाऱ्या व्याजावर ५०,००० रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा करू शकतात. या कपातीचा लाभ घेण्यासाठी ITR मध्ये व्याजाचा उल्लेख करणे आवश्यक असून कलम 80TTB अंतर्गत वजावटचा लाभ मिळू शकतो. तर ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना 80TTB चा लाभ मिळत नाही.

एफडीवरील व्याज एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असल्यास बँका १०% दराने टीडीएस कापते. ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवरील व्याजही मर्यादा ५०,००० रुपये आणि नॉन-ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी मर्यादा ४०,००० रुपये आहे. तसेच व्याजासह तुमचे एकूण उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा कमी असल्यास, तुम्ही फॉर्म 15G/15H भरून TDS कापला जाण्यापासून रोखू शकता.

५० वर्षांसाठी ७५ हजार कोटींचं कर्ज अन् तेही बिनव्याजी; मोदी सरकारची योजना नेमकी कोणासाठी?
जुन्या कर प्रणालीत ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या करदात्यांसाठी मूळ सूट मर्यादा २.५ लाख रुपये तर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मर्यादा ३ लाख रुपये आहे, अति ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच ८० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी ही मर्यादा पाच लाख रुपये आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ पासून नवीन कर प्रणालीत मूळ सूट मर्यादा तीन लाख रुपये आहे.

अल्पबचत योजनांच्या व्याजावर कर
सामान्यांना छोटी-छोटी बचत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अल्पबचत योजनांमधील आरडी, किसान विकास पत्र (KVP) आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) या आवर्ती ठेवींसारख्या योजनांमधून मिळणारे व्याज देखील करपात्र आहे. व्याजातून होणारी कमाई तुमचे उत्पन्न मानले जाईल ज्यावर टॅक्स स्लॅबनुसार कर भरावा लागेल. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रसिद्ध ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजेच SCSS मध्ये गुंतवणूक केल्यास नियमित अंतराने व्याजाचा लाभ मिळतो ज्याच्यावर कर आकारला जातो. जर व्याजासह एकूण उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा कमी असेल तर कोणताही कर लागणार नाही.

कोण-कोणती कमाई टॅक्स फ्री
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी किवां PPF अशा काही बचत योजनांपैकी आहे, जी EEE म्हणजेच एक्झम्प्ट-एक्झम्प्ट-एक्झम्प्ट श्रेणीमध्ये येते. म्हणजे PPF मध्ये जमा मूळ रक्कम, व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे.

Read Latest Business NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *