[ad_1]

कोल्हापूर: राज्यसभेतील माजी खासदार संभाजी राजेंनी कोल्हापूर लोकसभेसाठी स्वराज्य पक्षालाच प्राधान्य दिल्याने महाविकास आघाडीत चलबिचल वाढली आहे. मात्र संभाजी राजेंची वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. याबाबत लवकरच त्यांची आणि श्रीमंत शाहू महाराजांची भेट घेऊन याबाबत निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघात संभाजी राजेंना उमेदवारी देण्यासाठी महाविकास आघाडी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीबाबत अजून महायुतीने पत्ते खोलले नाहीत, कोणते पक्ष किती जागा लढवणार हे अजून स्पष्ट नाही, किमान महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या असून आघाडीच्या जागावाटपासाठी १० तारखेचा मुहूर्त ठरला आहे. जागा वाटप झाल्यानंतरच दिशा स्पष्ट होणार. यामुळे महाविकास आघाडीत काही अडचण असणार नाही.

कोल्हापूर लोकसभेच्या जागेवर राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा दावा आहे, हा दावा स्वाभाविक आहे. मात्र कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी वरिष्ठना कळवले आहे. आता कोल्हापूरची जागा कोणत्या पक्षाकडे जाणार यावर ती जागा ठरेल, काँग्रेस पक्षांकडे जागा आली तर चांगलाच उमेदवार दिला जाईल, कोल्हापुरात काँग्रेसला चांगले वातावरण असल्याने आमच्याकडे जागा राहावी यासाठी आग्रही असल्याचे आमदार सतेज पाटील यावेळी म्हणाले.

पोलीस ठाण्यात गोळीबार करत असेल तर सामान्य माणसाने आशेने कोणाकडे बघायचं?

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर कोणाचेच नियंत्रण नाही, आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करत असेल तर सामान्य माणसाने आशेने कोणाकडे बघायचं? राज्यात नेहमी कायदा व सुव्यवस्था चागंली राहिली. मात्र ही परिस्थिती सत्ताधारी बिघडवण्याचं काम करत आहेत. तीन पक्षाचं सरकार असल्याने कोण सरकार चालवत कळतं नाही, अधिकाऱ्यांवर कोणाचाच वचक राहिलेला नाही, पूर्णपणे परिस्थिती ढासळली आहे.

मुख्यमंत्र्याची गुंडगिरी आहे, असे आमदार म्हणत असेल तर याचा खुलासा मुख्यमंत्री यांनी करणे गरजेचे आहे. हा वाद लोकांच्या हितासाठी झाला का? एखाद्या जागेसाठी झाला याचा खुलासा झाला पाहिजे, सरकार टीकवण्यासाठी तुम्ही काहीही करा अशी मुभा दिली आहे का? असा सवाल ही माजी गृहमंत्री आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *