हरदा: मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात ब्लास्ट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून ४२ जण जखमी झाल्याची माहिती आहे. शहरातील मरगधा रोड येथील फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे.

या फटाका कारखान्यात स्फोट झाल्यानंतर त्याच्या आसपासच्या जवळपास ५० पेक्षा अधिक घरांना भीषण आग लागली. हा स्फोट इतका जबरदस्त होता की आवाज ऐकताच लोक इकडे तिकडे पळताना दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरु केलं.

या घटनेनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यावर लक्ष ठेवून आहे. त्यांनी अधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेतली. सध्या संपूर्ण प्रशासन अलर्टमोडवर आहे. तसेच, भोपाळ, इंदूर येथील मेडिकल कॉलेज आणि एम्स भोपाळमधील बर्न युनिटला आवश्यक ती तयारी करण्यास सांगितलं आहे. तसेच, इंदूर येथील डॉक्टरांची चमू हरदाकडे रवाना करण्यात आली आहे.

हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज ऐकूनच परिसरातील लोक हादरुन गेले. या स्फोटानंतर आगीने रौद्र रुप धारण केलं. ज्यामुळे परिसरातील ५० पेक्षा जास्त घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. स्फोटानंतर परिसरात गोंधळाचं वातावरण होतं. कारखान्यातून उठणाऱ्या आगीच्या ज्वाळा पाहून लोकांना धडकी भरली.

मैत्रिणीला वाटेत गाठलं, विहिरीजवळ नेऊन भयंकर पद्धतीनं संपवलं; क्राइम पेट्रोल पाहून रचला प्लान
आसपासच्या जिल्ह्यातून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलंही आग इतकी मोठी आहे की आसपासच्या जिल्ह्यातील अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी बोलवावं लागलं. नर्मदापुरम, भोपाळ, बैतुल, सिहोर येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *