पाटणा : जदयूचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची चिंता मिटल्याचं चित्र आहे. हम पक्षाचे नेते जीतनराम मांझी यांनी एनडीएसोबत राहण्याचा निर्णय घेत विधिमंडळात हजेरी लावली आहे. जदयूचे काल रात्रीपर्यंत संपर्काबाहेर असलेले चार आमदार यांचा ठावठिकाणा लागला असून ते देखील नितीशकुमारांसोबत राहणार आहेत. यामुळं जदयू भाजपच्या सरकारचा विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्र आहे. नितीश कुमार आजचा विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकतील मात्र तेजस्वी यादव यांनी देखील जदयू आणि भाजपवर दबाव निर्माण करण्यात यश मिळवलं आहे.

तेजस्वी यादवांनी काय मिळवलं?

तेजस्वी यादव यांच्याकडे बहुमत नसल्यानं नितीशकुमार यांना विश्वासदर्शक प्रस्तावात ते पराभूत करु शकत नसले तरी भाजप आणि जदयूवर दबाव वाढवण्यात यश मिळवलं. भाजपला त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवावं लागलं. जदयू नेत्यांनी आयोजित केलेल्या दोन स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला चार आमदार नसल्यानं देखील सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली होती. भाजपनं विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्तानं सर्व आमदारांना एकत्र ठेवलं होतं. भाजपनं याला प्रशिक्षणाचं नाव दिलं होतं. मात्र, तेजस्वी यादव यांच्या खेळ होणार या वक्तव्यामुळं भाजपनं आमदारांना एकत्रित ठेवलं होतं, असं बोललं जातंय. या प्रशिक्षण वर्गाला भाजपचे तीन आमदार हजर नव्हते. या सर्व प्रकरणातून भाजपच्या शिस्तीचा मुद्दा आणि आमदारांची गैरहजेरी ही बाब अधोरेखित करण्यात तेजस्वी यादव यांना यश आलं.

जीतनराम मांझी साथ देणार, नितीश कुमाारांचं टेन्शन मिटलं

हम पक्षाचे नेते जीतनराम मांझी यांनी दोन मंत्रिपदांची मागणी केली होती. मात्र, त्यांच्या पक्षाला एकच खातं देण्यात आलं. त्यावरुन देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. जीतनराम मांझी यांनी रात्री उशिरा त्यांचा फोन बंद केला होता. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीनं त्यांची रात्रीचं भेट घेत त्यांची समजूत काढली. जीतनराम मांझी त्यांच्या सहकारी आमदारांसह विधिमंडळात पोहोचले. जीतनराम मांझी यांच्या पक्षाकचे ४ आमदार आहेत. या चार आमदारांचा पाठिंबा मिळाल्यानं नितीशकुमारांचं टेन्शन मिटलं आहे. नितीशकुमार यांच्याकडे भाजपचे ७८, जदयूचे ४५, मांझी यांच्या हम पक्षाचे ४ आमदार आणि एका अपक्ष आमदाराच्या पाठिंब्यासह १२८ आमदारांचं पाठबळ आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *