धनाजी चव्हाण, परभणी : ”माझ्या मराठा समाजाला पक्के आरक्षण मिळवण्यासाठी सगळे सोयरेचा कायदा पारित होणे आवश्यक आहे. परंतु शासन तो कायदा पारित करत नाही. या कारणामुळे मी आत्महत्या करत आहे”. अशी चिठ्ठी लिहून परभणीच्या सेलू तालुक्यातील राजवाडी येथील प्रताप शेवाळे या मराठा तरुणाने आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सेलू तालुक्यातील राजवाडी येथील राहणारे प्रताप शेवाळे या २७ वर्षीय युवक आज सकाळी आपल्या शेताच्या शेजारील असलेल्या बांधवांचा डब्बा देण्यासाठी म्हणून शेताकडे निघाला. पण ते शेजाऱ्याच्या शेतात गेलाच नाही तर आपल्या शेतात जाऊन शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आज अकरा वाजेच्या दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांना झाडाला कोणीतरी गळफास लावल्याचे आढळून आले आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

प्रताप शेवाळे या युवकाचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून तो शेती हा व्यवसाय करत होता. प्रतापला मराठा आरक्षण लवकरात लवकर लागू व्हावे, अशी मनापासून इच्छा होती. सेलू येथे मराठा आरक्षणासाठी वेळोवेळी जी आंदोलने झाली त्यामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. अंतरवाली सराटी येथे देखील मनोज जरांगेच्या सभेला तो आवर्जून उपस्थित होता. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जालना ते मुंबई पायी प्रवासात देखील आपल्या गावकऱ्यांसह सक्रिय सहभाग होता. एवढे करूनही अद्यापही सगळे सोयरेचा कायदा सरकारने पारित केला नाही. मराठा आरक्षणाला वेळ होत आहे. त्यामुळे प्रतापने हे टोकाचे पाऊल उचलले. चिठ्ठीमध्ये ”एक मराठा, लाख मराठा”,असं लिहित आपली जीवनयात्रा संपवणाऱ्या प्रतापसाठी परभणी जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रशांत पाटील यांच्याविषयी

प्रशांत पाटील
प्रशांत पाटील

प्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात.… Read MoreSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *