ठाणे : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आलं. तेव्हा न्यायालयाने त्यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. म्हणजे गणपत गायकवाड यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयात थेट सुनावणी ऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होणार होती. मात्र, पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगर येथील न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायालयाबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला.

“पोलीस मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत आहेत”, असा थेट आरोप न्यायालयातच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. ”गोळीबार प्रकणात माझा मुलगा आरोपी नसून त्यालाही आरोपी बनवण्यात आलं”, असं देखील गायकवाड यांनी म्हटलं आहे. ”माझ्यासारख्या माणसाला कायदा हातात का घ्यावा लागला”? असा प्रश्न देखील त्यांनी न्यायालयात उपस्थित केला.

Breaking News: महाविकास आघाडीचा उमेदवार छत्रपती घराण्यातीलच; शाहू महाराज की संभाजीराजे याचा निर्णय ४ दिवसात
पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की, “गणपत गायकवाड यांनीच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर बंदुक जप्त करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी हा सुनियोजित कट असल्याचं दिसतं, असं देखील पोलिसांनी न्यायालयात सांगितलं. तसंच आमदार गणपत गायकवाड यांच्या आवाजाची चाचणी घ्यायची आहे, त्यामुळे त्यांना १४ दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली आहे. मात्र, त्यावर न्यायालयाने गणपत गायकवाड यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
काँग्रेसचे १५ आमदार कुंपणावर; तिघे अजित पवारांच्या संपर्कात; महिन्याभरात मोठा भूकंप?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *