[ad_1]

नवी दिल्ली : राजकारणात विविध विचारसरणी असतात हे मान्य आहे पण म्हणून महान नेत्यांचं योगदान नाकारता येत नाही. पंडित नेहरू यांनी भारत देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं. त्यांच्यापासूनच भारतातील लोकशाहीला सुरूवात झाली. विज्ञान तंत्रज्ञानाला नेहरूंनी चालना दिली, हे योगदान आजचे सत्ताधारी कसे नाकारू शकतात? असा परखड सवाल विचारून दिवंगत नेत्यावर अशा प्रकारची टीका करणं बरं नाही, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्या भाषणावर तीव्र नापसंती व्यक्त केली. त्याचवेळी धार्मिक विधाने करून देशाची दिशाभूल सुरू आहे, अशी टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजधानी नवी दिल्लीमध्ये देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीसंदर्भातील दिलेल्या निकालानंतर पवार पहिल्यांदाच बोलत होते. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत केलेल्या भाषणांदरम्यान नेहरू आणि गांधी घराण्यावर गंभीर आरोप करून त्यांच्या धोरणांवर यथेच्छ टीका केली. इथून मागच्या काँग्रेस सरकारांना लक्ष्य करताना आपलं सरकार किती वेगवान काम करतंय, हे संसदेतील भाषणांच्या माध्यमातून जनतेच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहातून मोदींनी केला. लोकसभा निवडणुकीआधी अखेरच्या अधिवेशनातून मोदींनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवून खरं तर लोकसभेचा प्रकार कसा असेल, याची झलकच दाखवली. मोदींच्या लोकसभा आणि राज्यसभेतील दोन्ही भाषणांवर शरद पवार यांनी कडक शब्दात टीका करताना तीव्र नाराजी व्यक्त केली.

नेहरूंचं योगदान कसं नाकारू शकता?

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या नेत्यांनी आपल्या आयुष्यातील मोठा काळ तुरुंगात घालवला, त्यात पंडित नेहरू अग्रक्रमाने येतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम पंडित नेहरू यांनी केलं. खरं तर भारतातील लोकशाहीला त्यांच्यापासूनच सुरूवात झाली. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य कोण नाकारू शकतं? परंतु आजचे सत्ताधारी दिवंगत नेत्यांवर अशा प्रकारचे आरोप करतायेत. मोदींचं भाषण ऐकून दु:ख झालं, असं शरद पवार म्हणाले.

काँग्रेस आरक्षणाची विरोधक, नेहरूंचा तर तीव्र विरोध होता, बाबासाहेबांचे विचार संपविण्याचं काम, मोदींचे गंभीर आरोप
पंतप्रधान हा पक्षाचा नसतो, तो देशासाठी असतो

राजकारणात वेगवेगळ्या विचारसरणी असतात हे मान्य आहे पण म्हणून महान नेत्यांचं योगदान नाकारता येत नाही. परंतु ज्यांनी देशासाठी काम केलं, त्यांचं काम नजरेआड कसं करू शकतो मग ते नेहरू असोत की इंदिरा गांधी असोत.. प्रत्येक पंतप्रधानांचं आपापल्या परीने देशासाठी योगदान असतं. पंतप्रधान हा पक्षाचा नसतो, तो देशासाठी असतो, असंही पवार म्हणाले.

इंग्रजीतून प्रश्न, राणे गडबडले, भलतंच उत्तर दिलं, भाजप खासदारानेच अडचणीत आणलं!

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *