[ad_1]

छत्रपती संभाजीनगर: खाजगी शिकवणीसाठी जाणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्यांच्या खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट झाला. यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, मुलाचा पाय भाजला गेला आहे. ही घटना शुक्रवार दिनांक ११ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास गंगापूर तालुक्यात घडली. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आदेश आप्पासाहेब झोजे (वय १७ वर्ष राहणार शिवाजीनगर गंगापूर) असे मोबाईलच्या स्फोटामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आदेश हा कुटुंबीयांसोबत गंगापूर शहरातील शिवाजीनगर येथे राहतो त्याचे वडील वकील आहेत. आदेश हा अकरावीला असून त्याने महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. तसेच, तो खाजगी शिकवणीसाठी गंगापूर शहरामध्ये शिक्षण घेत होता.

७ फूट उंची, पिवळे डोळे अन्… येथे एलियन्सच्या हल्ल्याचा दावा, दहशतीमुळे लोकांची झोप उडाली
दरम्यान शुक्रवार दिनांक ११ रोजी नियमित वेळेनुसार आदेश हा सकाळी लवकर उठला. चार महिन्यांपूर्वी विकत घेतलेला मोबाईल चार्जिंगला लावला. तोपर्यंत तो तयारी करत होता. त्यानंतर चार्जिंग झालेला मोबाईल घेऊन आदेश खाजगी शिकवणीसाठी घराबाहेर पडला. ट्युशन साडेआठ वाजता असल्याने तो आठ वाजताच घरातून बाहेर पडला. पंधरा मिनिटानंतर ट्युशनच्या दिशेने जात असतात अचानक आदेशाच्या खिशात असलेल्या मोबाईल गरम होऊन त्याच्यामध्ये भयंकर स्फोट झाला.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

अचानक घडलेल्या घटनेमुळे आदेश घाबरून गेला होता. त्याने तात्काळ खिशातील मोबाईल खाली टाकून दिला. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोबाईलवर पाणी टाकलं आणि आदेशला धीर दिला. या स्फोटामध्ये आदेशच्या मांडीला इजा झाली होती. त्याची मांडी भाजली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब शिरसाट यांनी त्याला तात्काळ घरी नेऊन सोडले. यावेळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एकाच देशात दिसले १००० यूएफओ, शास्त्रज्ञांनी सांगितलं कुठे लपले आहेत एलियन्स, पहा…

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *