[ad_1]

नागपूर : जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघाकरिता माजी आमदार प्रकाश गजभिये यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी द्यावी, असा ठराव रविभवन येथील कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने ठराव झाला. रामटेकमध्ये सलग दोनवेळा शिवसेनेचा खासदार आहे. विद्यमान खासदार कृपाल तुमाणे सध्या शिंदे गटात आहेत, परंतु या जागेवरुन शिवसेना कायम रिंगणात उतरत आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत ठाकरे गटाचा या मतदारसंघावर पहिला दावा मानला जात होता. परंतु आता पवार गटाने दावा सांगत उमेदवारही पुढे केला आहे.

प्रकाश गजभिये यांचा रामटेक लोकसभेच्या उमेदवारीचा प्रस्ताव प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी ठेवला तर नागपूरचे जिल्हाध्यक्ष राजू राऊत व अविनाश गोतमारे यांनी प्रस्तावाचे अनुमोदन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलिल देशमुख अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रकाश गजभिये यांच्या नावाची उमेदवारी जाहीर होताच ग्रामीण कार्यकारिणी सदस्य व तसेच युवा कार्यकर्त्यांनी हात उंच करुन प्रस्तावाचे स्वागत केले.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत पुण्यातील ९ आमदार, पण एका शिलेदाराचा ‘काकां’ना आधार, एकमेव नेता कोण?
वाडी नगर पंचायतचे शाम मंडपे, कुही येथील ग्राम पंचायत सदस्य आशिष आवळे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष संतोष नरवाडे, सावनेर तालुका अध्यक्ष कपिल वानखेडे, युवक कार्याध्यक्ष शैलेंद्र तिवारी व नागपूर विद्यार्थी जिल्हाध्यक्ष आकाश गजभिये यांनी सुद्धा आपल्या भाषणात रामटेक लोकसभेची उमेदवारी प्रकाश गजभिये यांना देण्याची मागणी केली.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

दादा यंग, काम लगेच; साहेबांनी घरी बसून दादांना मार्गदर्शन करावं, पवारांच्या गावातील लोकं काय म्हणाले?


नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असून हिंगणा, काटोल व उमरेड व अन्य विधानसभा मतदारसंघात सुद्धा संघटन मजबूत आहे असे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी युवा अध्यक्ष आशिष पुंड, गुड्डू बोकडे, मकसुद शेख, वेदांत गोतमारे, पंकज चुकांबे, आदित्य लोखंडे, साबीर शेख, रामटेकचे सचिन आमले, सौरभ मिश्रा, खापरखेडा येथील सूरज बागडे, विशाल गाडबैल, सोनू गोयल, युवक विद्यार्थी आदि कार्यकर्ता उपस्थित होते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *