मुंबई : रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काहीच आलबेल नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे रोहित शर्मा आता यावर्षीच मुंबई इंडियन्सच्या संघाला रामराम करू शकतो. पण रोहित शर्माच्या संघ बदलण्याच्या मार्गात मुंबई इंडियन्स अडथळा निर्माण करू शकते. कारण संघ बदलण्यासाठी आयपीएलचे काही नियम आहेत आणि त्यानुसार रोहित शर्माचा दुसऱ्या संघात जाण्याचा मार्ग अवघड होऊ शकतो.

या वर्षी जर एखाद्या खेळाडूला दुसऱ्या संघात जायचे असेल तर अजूनही ८ दिवसांचा अवधी आहे. कारण आयपीएल सुरु होण्याच्या १ महिन्यापूर्वी कोणताही खेळाडू दुसऱ्या संघात जाऊ शकतो. त्यामुळे या वर्षात २१ फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोणताही खेळाडू दुसऱ्या संघात जाऊ शकतो. दुसऱ्या संघात जाण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे खेळाडूची इच्छा असली पाहिजे. खेळाडूची इच्छा असेल तर त्याला दुसऱ्या संघात जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पण याबरोबच संघालाही त्या खेळाडूला सोडण्याची इच्छा असली पाहिजे. पण जर खेळाडूची इच्छा दुसऱ्या संघात जाण्याची असेल, पण फ्रँचायझीला दुसऱ्या संघात पाठवायचे नसेल तर काय होऊ शकते, याबाबतचा नियम आता समोर आला आहे. जर खेळाडूला दुसऱ्या संघात जायचे असेल आणि फ्रँचायझीला त्याला सोडायचे नसेल तर यामध्ये सर्वात जास्त महत्व हे फ्रँचायझीला देण्यात आले आहे. जे फ्रँचायझी ठरवेल ते खेळाडूला ऐकावे लागेल. या गोष्टीचा अर्थ असा होतो की, जर रोहित शर्माला मुंबई इंडियन्सला सोडायचे असेल, पण जर संघाला त्याला सोडायचे नसेल तर त्याला दुसऱ्या संघात जाता येणार नाही. त्यामुळे रोहित शर्माला दुसऱ्या संघात जाण्याच्या मार्गात मुंबई इंडियन्सचा संघ अडथळा निर्माण करू शकतो. त्यामुळे जर रोहित शर्माला दुसऱ्या संघाच जायचे असेल तर त्यापूर्वी त्याला मुंबई इंडियन्सचे काय मत आहे, हे जाणून घ्यावे लागेल. मुंबई इंडियन्सचा संघ जर त्याला सोडण्यासाठी तयार नसेल तर रोहित शर्माला दुसऱ्या संघात जाता येणार नाही.

रोहित शर्मा एअरपोर्टवर स्पॉट

या आयपीएलसाठी २१ फेब्रुवारी हे खेळाडूला संघ बदलण्यासाठी अखेरची तारीख असणार आहे. पण जर एका खेळाडूला संघ सोडायचा असेल तर त्यासाठी त्याला आपल्या फ्रँचायझीची परवानगी घ्यावी लागेल, त्याशिवाय कोणत्याही खेळाडूला संघ सोडता येणार नाही. त्यामुळे आता रोहित शर्माचे या आयपीएलमध्ये नेमकं काय होतं, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *