म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : महापालिकेने मुंबईतील महामार्गांसह इतर ठिकाणी बांबूंची लागवड करून ग्रीन कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर अशा हजारो बांबूच्या झाडांची लागवड होणार आहे. संपूर्ण मुंबईत पाच लाख बांबू लावले जाणार आहेत. त्यापैकी ८,१०० बांबूच्या लागवडीच्या निविदा प्रक्रियेचे काम सुरू करण्यात आले आहे.पहिल्या टप्प्यात पूर्व द्रुतगती महामार्गालगत भांडूप ते कन्नमवार नगरपर्यंत दोन्ही बाजूला सहा किलोमीटरवर बांबूची भिंत उभारली जाणार आहे. यासाठी तब्बल ८,१०० बांबूचा वापर केला जाणार आहे. ही भिंत सहा फूट रुंदीची असेल. बांबू ही इंडोजेनियस आणि प्रथम वाढणारी प्रजाती आहे. मुंबईत विविध भागात बांबूची लाखो झाडे लावण्यासाठी पालिकेचा उद्यान विभाग जागेचा शोध घेत आहे. बांबूच्या सुमारे १६०० जाती असून यासाठी शेतकरी नेते पाशा पटेल यांची मदत घेतली जाणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत या प्रकल्पांतर्गत पाच लाख बांबूची झाडे लावण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.बांबूचीच निवड का?पालिकेने बांबू का लावण्याचा निर्णय घेतला याचे स्पष्टीकरण देताना, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी अलीकडील संशोधनाचा संदर्भ दिला. बांबू हा इतर झाडांच्या तुलनेत ३५ टक्के जास्त ऑक्सिजन सोडतो. यामुळे, बांबू लावणे हा कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचा एक चांगला मार्ग आहे, तसेच बांबूची देखभाल इतर झाडांच्या तुलनेत कमी खर्चिक आहे, असे त्यांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *