[ad_1]

नवी दिल्ली : भारताचा अर्थसंकल्प गुरुवारी सादर करण्यात आला. पण या अर्थसंकल्पामध्ये क्रीडा क्षेत्राला नेमकं काय मिळालं आहे, याची संपूर्ण माहिती आता समोर आली आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयास अंतरिम अर्थसंकल्पात ३ हजार ४४२.३२ कोटी रुपये देण्यात आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ केवळ ४५.३६ कोटी रुपयांची आहे. गतवर्षीच्या अर्थसंकल्पात सुधारीत तरतूद ३ हजार ३९६.९६ कोटी रुपये होती. नव्या आर्थिक वर्षात पॅरिसमध्ये होणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा क्रीडा मंत्रालयासाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे. ही स्पर्धा २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. दरम्यान, ‘खेलो इंडिया’साठी अंतरिम अर्थसंकल्पात ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात गतवर्षीपेक्षा वीस कोटींची वाढ करण्यात आली आहे. विविध राष्ट्रीय शिबिरांचे आयोजन करणाऱ्या; तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंना सुविधा पुरवणाऱ्या आणि प्रशिक्षकांची नियुक्ती करणाऱ्या क्रीडा प्राधीकरणाच्या तरतूदीत २६.८३ कोटींची वाढ करण्यात आली आहे. ही तरतूद आता ७९५.७७ कोटी रुपयांची असेल.

राष्ट्रीय क्रीडा महासंघांना गतवर्षीपेक्षा या वेळी १५ कोटी रुपये जास्त मिळतील. गतवर्षीची तरतूद ३२५ कोटी होती. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेची तरतूद २२.३० कोटींवरून २१.७३ कोटी रुपये करण्यात आली आहे. राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला आता अतिरिक्त २.५ कोटी रुपये मिळणार आहे. त्यामुळे ही रक्कम २२ कोटी असेल.

महत्त्वाचे मुद्दे
– नॅशनल सेंटर ऑफ स्पोर्ट्स सायन्स अँड रिसर्चची तरतूद १०ऐवजी ८ कोटी
– राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची तरतूद ८३.२१ कोटीवरून ९१.९० कोटी
– क्रीडापटूंच्या प्रोत्साहन बक्षिसाची रक्कम ८४वरून ३९ कोटी
– राष्ट्रीय क्रीडा विकास निधीत १८ कोटींची घट, नवी तरतूद ४६ कोटी
– जम्मू काश्मीरसाठी २०ऐवजी ८ कोटींचीच तरतूद
– राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीची तरतूद १५ कोटी होती, ती केवळ १ लाख

पी. टी. उषा यांच्याकडून स्वागत

मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद पांड्याला, पुणेकरांच्या प्रतिक्रिया काय?

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, ‘हे ऑलिम्पिक वर्ष आहे. यामुळे खेळाडूंच्या सराव कार्यक्रमांकावर अधिक भर द्यावा लागणार आहे. अर्थसंकल्पात मिळालेल्या वाढीचा फायदा खेळाडूंना चांगले प्रशिक्षण, स्पोर्ट्स सायन्सचा पाठिंबा आणि इतर गोष्टींसाठी निश्चित होईल. स्त्रोतांची चिंता न करता त्यांच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी खेळाडूंना आर्थिक पाठबळ देणे महत्वाचे आहे. सरकार, क्रीडा संघटना आणि जनता यांच्या एकत्रित प्रयत्नांनी आपले खेळाडू जागतिक स्तरावर चमकतील यात वादच नाही.’

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *