[ad_1]

सातारा: दिशा सालियान आणि सुशांतसिंग प्रकरणातील केसमधील पुरावे समोर येऊ लागले असून ८ आणि १३ तारखेला दिशा सालियान आणि आदित्य ठाकरे यांच टॉवर लोकेशन एकच होतं. या सगळ्या प्रकरणात आदित्य ठाकरे अडचणीत येऊ शकतात. तसेच अटक‌ टाळण्यासाठी आदित्य ठाकरे देशाबाहेर जाऊ शकतात, असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे.
आदित्य ठाकरेंनी दुपारी प्रश्न मांडला, काही तासांतच एकनाथ शिंदेंकडून बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर
या केसमध्ये काहीच नसतं तर उद्धव ठाकरे यांनी तक्रारदाराला केस मागं घ्यायला ५० कोटींची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट सुद्धा नितेश राणे यांनी केला आहे. वर्षावर ड्रग घेतलेली लोकं येतात. या प्रश्नावर नितेश राणे यांनी थेट निशाना साधत अगोदरच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगाच ड्रगवाला आहे, असं‌ म्हणत थेट आदित्य ठाकरे यांच्यावर निशाना साधला. दरम्यान गृहखाते बदनाम होणार असेल, तर ते खपवून घेणार नाही. एटीएसच्या माध्यमातून कराड तालुक्यातील स्फोटाचा तपास व्हावा. हिंदू समाजाच्या विरोधात कोण वागत असेल, तर लोकप्रतिनिधींचा देखील पाणउतारा केला जाईल, असा सज्जड इशारा आमदार नितेश राणे यांनी कराड येथे केली.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या बातमीमुळे जीव वाचला, आदेश बांदेकरांनी सांगितली जीवघेणी आठवण

सातारा जिल्ह्यातील कराड येथील मुजावर कॉलनी येथे मागील महिन्यात झालेल्या स्फ़ोटामुळे नुकसान झालेल्या ठिकाणी आमदार नितेश राणे यांनी भेट दिली. या स्फोटामुळे झालेल्या नुकसानीचीही राणे यांनी पाहणी केली. या स्फोटाबाबत तपास करणाऱ्या अधिकारी यांच्याशी राणेंनी चर्चा केली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *