म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : ‘संसदेत गोंधळ घालून लोकशाहीचे वस्त्रहरण करणाऱ्या खासदारांसाठी हे अखेरचे लोकसभा अधिवेशन पश्चाताप करण्याची संधी आहे. विरोधकांनी या वृत्तीबद्दल आत्मपरीक्षण करावे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संताप व्यक्त केला. ‘परंपरेनुसार आम्ही हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहोत व निवडणुकीनंतर पूर्ण अर्थसंकल्प सादर करू,’ असे सांगून त्यांनी केंद्राच्या सत्तेतील पुनरागमनाचाही विश्वास व्यक्त केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पत्रकारांशी बोलताना सर्वांना माझा राम-राम अशी सुरुवात करून, मोदी यांनी संतापाने, लालबुंद चेहऱ्याने संसदेतील गोंधळावर भाष्य केले. ‘ गेल्या १० वर्षांत ज्यांनी गदारोळ घातला, त्यांना त्यांच्याही मतदारसंघांत कोणी लक्षात ठेवणार नाही; परंतु सभागृहांत अर्थपूर्ण चर्चेत ज्यांनी मते मांडणारे कायम आठवणीत राहतील,’ असे ते म्हणाले.

हिवाळी अधिवेशनात विक्रमी संख्येने निलंबित केलेल्या १४६ खासदारांवरील कारवाई अखेरच्या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मागे घेण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर मोदी यांनी संसदेत गदारोळ घालणाऱ्यांना लक्ष्य केले.

‘स्त्रीशक्तीच्या साक्षात्काराचाच उत्सव’

‘नव्या संसदेतील पहिल्या अधिवेशनातच घेतलेला सन्मानजनक निर्णय म्हणजे नारीशक्ती वंदन कायदा. यंदा २६ जानेवारीलाही कर्तव्यपथावर महिलाशक्तीचे सामर्थ्य आणि शौर्य देशाने अनुभवले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मार्गदर्शन आणि गुरुवारी निर्मला सीतारामन यांचा अंतरिम अर्थसंकल्प हा स्त्रीशक्तीच्या साक्षात्काराचाच उत्सव आहे,’ असे मोदी यांनी नमूद केले.
Budget 2024: निर्मला सीतारामन कधी, किती वाजता सादर करणार अर्थसंकल्प? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
गेल्या दहा वर्षांत देशाने राष्ट्रीय हिताची अनेक कामे पूर्ण झाल्याचे पाहिले. राम मंदिर बाधले जावे, अशी आकांक्षा शतकानुशतके लोकांच्या मनात होती. आज ती पूर्ण झाली. मंदिराचे उद्घाटन झाल्यापासून पाच दिवसांत १३ लाख भाविकांनी अयोध्येला भेट दिली. २२ जानेवारीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा युगप्रवर्तक क्षण होता.- द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

अंतरिम अर्थसंकल्प आज

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीतील अखेरचा अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम आज, गुरुवारी सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्याची सीतारामन यांची ही सहावी वेळ असेल. एप्रिलमध्ये लोकसभा निवडणूक असल्यामुळे गुरुवारचा अर्थसंकल्प म्हणजे लेखानुदान असण्याची शक्यता आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *