[ad_1]

: कर्नाटकची राजधानी बंगळुरुतील कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगमध्ये ७२ परदेशी साप आणि ६ कॅपुचिन माकडं आढळून आली आहेत. अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली. विमातळावरुन ५५ बॉल अजगर, १७ किंग कोब्रा आणि ६ कॅपुचिन माकडं जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यापैकी अजगर आणि कोब्रा जिवंत असून माकडं मृतावस्थेत सापडली आहेत.बंगळुरू कस्टमनं दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकहून एअर एशियाच्या विमानानं एक प्रवासी बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास बंगळुरु विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे असलेलं सामान तपासलं. त्याच्याकडे असलेल्या बॅगमध्ये ७८ प्राणी होते. त्यात विविध रंगांच्या ५५ अजगरांसह १७ किंग कोब्रांचा समावेश होता. हे प्राणी जिवंत स्थितीत सापडले. पण ६ कॅपुचिन माकडं मृतावस्थेत आढळली.बॅगमध्ये सापडलेल्या सर्व प्राण्यांचा समावेश वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ च्या यादीत होतो. सीमा शुल्क अधिनियम, १९६२ च्या कलम ११० च्या अंतर्गत प्राण्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. जिवंत अवस्थेत असलेल्या प्राण्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवण्यात आलं असून मृतावस्थेतील प्राण्यांची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.याआधी २१ ऑगस्टला याच विमानतळावर कस्टमच्या अधिकाऱ्यांना प्रवाशाच्या सामानात मृत कांगारु सापडलं होतं. सद्दाम हुसेन असं त्या प्रवाशाचं नाव होतं. तो मूळचा चेन्नईचा रहिवासी होता. त्याच्याकडे हिरवा इग्वाना, अल्दाब्रा कासव, व्हिएतनामी कासव आणि ७५ एशियन लीफ कासवंदेखील सापडली होती. या घटनेनंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली होती.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *