[ad_1]

मुंबई : अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई केली. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर अनेक निर्बंध लादले असून यानुसार नव्या ठेवी घेण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पेटीएम सुविधेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांमध्ये गोंधळ आणि संभ्रम पाहायला मिळत असून याचा परिणाम पेटीएमचा शेअर घसरण्यात झाला आणि पेटीएमच्या शेअरला रोज लोअर सर्किट लागत आहे.

परंतु आरबीआयने एवढे मोठे पाऊल का उचलले हा प्रश्न आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेने कोणत्या नियमाचे उल्लंघन केले? पेटीएम पेमेंट्स बँकेने जाणूनबुजून नियमांचे उल्लंघन केले आहे का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

PayTM Crisis: पेटीएम वॉलेटवर मुकेश अंबानींनी आहे नजर? आता नवीन अपडेट आले समोर, पाहा
केवायसी नियमांचे उल्लंघन
पेटीएम पेमेंट्स बँकेत लाखो बँक खाती आहेत. या खातेदारांची ओळख त्यांच्या खात्यांसोबत मॅप केलेली नाही. आरबीआयने केलेल्या तपासणीत आश्चर्यकारक तथ्य आढळले. शेकडो खात्यांसोबत एकच पॅन क्रमांक देण्यात आला होता. केवायसी प्री-पेड साधनांमध्ये हजारो कोटी रुपयांचे व्यवहार केले गेले, जे विहित मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. यामुळे मनी लाँड्रिंगचा संशय वाढला आहे.

जिओ धन धना धन! मुकेश अंबानी डाव साधण्याच्या तयारीत; शेअर्स तुफान तेजीत, गुंतवणूकदार मालामाल
आरबीआयच्या नियमांकडे दुर्लक्ष
बँक आणि तिची मूळ कंपनी यांच्यात अंतर राखावे असा आरबीआयचा नियम आहेत. पण पेटीएम पेमेंट्स बँकने हा नियम पाळला नाही. त्यांनी त्यांच्या प्रवर्तक समूह कंपन्यांसह आर्थिक आणि बिगर आर्थिक व्यवसाय एकत्र केले. बँकेने तिची मूळ कंपनी OCL च्या आयटी पायाभूत सुविधांचा वापर केला. मूळ कंपनीच्या ॲपद्वारे व्यवहार झाले. यामुळे डेटा गोपनीयता आणि डेटा शेअरिंगबद्दल गंभीर चिंता निर्माण होते.

विक्रीचा सपाटा सुरूच! स्टॉक ढेपाळला, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ; आता पेटीएमकडून आली नवीन अपडेट
नियमांचे पालन करण्याबाबत खोटेपणा

पेटीएम पेमेंट्स बँक नियमांचे पालन करण्याबाबत आरबीआयला खोटे बोलत राहिली. पेटीएम पेमेंट्स बँकेने आरबीआयकडे सादर केलेल्या अनुपालन दस्तऐवजांच्या छाननीत ते खोटे असल्याचे आढळले. त्याची तपासणी केवळ आरबीआयच्या पर्यवेक्षकांनीच केली नाही तर बाहेरील लेखापरीक्षकांनीही केली होती. पेटीएम पेमेंट्स बँकेने ओसीएलला मोठी रक्कम दिली, ज्याचे तपशील त्यांच्या आर्थिक विवरणात उघड केले गेले नाहीत. यातून आर्थिक गैरव्यवहार उघड होतो.

Read Latest Business News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *