नाशिकः गेल्या वर्षी युट्यूबवर अहिराणी भाषेतील ‘हाई झुमका वाली पोरं’ या गाण्याने प्रचंड धुमाकूळ घातला होता. सोशल मीडियावरदेखील या गाण्याची बरीच चर्चा होती. अल्पावधीच या गाण्याला लोकप्रियता मिळाली होती. आता हे गाणे आणि ह्या गाण्यातील अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्या मागचे कारण म्हणजे या गीतामधील अभिनेता विनोद उर्फ सचिन अशोक कुमावत विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुमावत याने लग्नाचे आमिष दाखवून ३० ऑगस्ट २०२२ ते १७ जानेवारी २०२३ या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी पीडित तरुणीवर शारीरिक अत्याचार केले. तसेच पीडित युवतीने पहिल्या लग्नाबाबत विचारणा केली असता तिला शिवीगाळ करून मारहाण करत लग्नास नकार दिला. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित कुमावतविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युट्यूब चॅनलद्वारे गीते प्रसारित करणाऱ्या कुमावतने पीडितेसोबत ओळख वाढवली. या ओळखीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमीष दाखवून मागील पाच महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी नेत शारीरिक अत्याचार केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेसोबत शूटिंगदरम्यान कुमावत याची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. ओळखीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमीष दाखवून पीडितेवर अत्याचार केला.

दरम्यान या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून विनोद उर्फ सचिन अशोक कुमावत (रा. म्हाडा कॉलनी सातपूर, नाशिक) याच्यावर नाशिक रोड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *