[ad_1]

नवी दिल्ली : भविष्याची काळजी सर्वानाच असते आणि यासाठी विशेषतः पगारदार लोकही सुरुवातीपासूनच बचत सुरू करतात. तुम्हालापण करोडपती व्हायचं असेल तर आता तुमच्याकडे वेळ आहे. करोडपती होण्यासाठी आजपासूनच गुंतवणूक करायला सुरुवात करा. ज्याप्रमाणे प्रत्येक महिन्याला पगार बँक खात्यात जमा होतो त्याप्रमाणे दर महिन्याला गुंतवणूक करावी लागते. छोट्या-छोट्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे म्हणजे एकूण जास्त रक्कम गुंतवण्याची गरज नाही. पण, तुम्ही नियमित गुंतवणूक केली पाहिजे.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात (पीपीएफ) गुंतवणुकीचा फायदा म्हणजे की या योजनेमुळे तुम्ही निवृत्तीचे वय होण्यापूर्वीच कोट्याधीश होऊ शकता. खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करून गुंतवणूक केल्यास वयाच्या ५५ व्या वर्षी तुम्ही करोडपती व्हाल. यासाठी फक्त एक ट्रिक वापरावी लागेल.

Small Savings vs FD: गुंतवणुकीबाबत कन्फ्यूज आहात? जाणून घ्या तुमच्यासाठी गुंतवणुकीचा कोणता पर्याय सेफ अन् बेस्ट
पीपीएफ व्याजदर
केंद्र सरकार मान्य पीपीएफ योजना पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक स्कीम आहे. सध्या या योजनेत ७.१ टक्के दराने व्याज दिले जात असून या गुंतवणुकीचा कालावधी १५ वर्षांसाठी आहे. म्हणजे १२,५०० रुपये प्रति महिना गुंतवणुकीनुसार १५ वर्षानंतर तुम्हाला एकूण ४०,६८,२०९ रुपये होईल. पीपीएफ गुंतवणुकीची एकूण रक्कम २२.५ लाख रुपये आणि १८,१८,२०९ रुपये व्याज मिळेल. परंतु आता करोडपती होण्यासाठी किती गुंतवणूक करायची आणि किती काळासाठी हे समजून घेणे आवश्यक आहे.

पीपीएफ गुंतवणुकीतून करोडपती व्हायची ट्रिक

NSC: पोस्टाची ही योजनाच जोरदार… पाच वर्षात मिळतील लाखो रुपये, FD तर विसरुनच जा; वाचा सविस्तर
पहिल्या प्रकरणानुसार…
समजा तुम्ही ३०व्या वर्षांपासून PPF मध्ये गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही दरमहा १२,५०० रुपयेनुसार १५ वर्षांनी तुमची एकूण गुंतवणूक ४०,६८,२०९ रुपये होईल. पण मॅच्युरिटी कालावधी पूर्वीच पैसे काढू नका आणि योजना ५-५ वर्षासाठी पुढे एक्सटेंड करा. १५ वर्षांनंतर पाच वर्षांपर्यंत वाढवण्याचा फायदा असा होईल की २० वर्षांनंतर तुमची एकूण गुंतवणूक ६६,५८,२८८ रुपये होईल. तसेच २० वर्षांनंतर आणखी पाच वर्षांसाठी गुंतवणूक वाढवा. अशाप्रकारे २५ वर्षांनंतर रक्कम १,०३,०८,०१५ रुपये होईल, म्हणजे तुम्ही करोडपती व्हाल.

५५व्या वर्षी करोडपती व्हा!
वरील कॅल्क्युलेशननुसार ३० व्या वर्षी गुंतवणूक सुरू करून तुम्ही अवघ्या २५ वर्षात कोट्याधीश बनू शकता. वयाच्या तिशीत पीपीएफमध्ये दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि २५ वर्षे तिथेच ठेवा. वयाच्या ५५ व्या वर्षी तुमच्याकडे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी असेल. मात्र जर तुम्ही दर महिना १२,५०० रुपये गुंतवू शकत नसाल तर रक्कम थोडी कमी करा. पण तुम्हाला वयाच्या ५५ व्या वर्षी करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला थोडं आधी सुरुवात करावी लागेल.

Business Ideas: बिझनेसचा जबरदस्त प्लॅन, एकदा सुरू झाल्यास पैसाच पैसा कमावणार; पाहा संपूर्ण माहिती
२५ व्या वर्षी PPF मध्ये दरमहा १०,००० रुपयांची गुंतवणूक सुरू करा आणि ७.१% दराने १५ वर्षांनंतर एकूण ३२,५४,५६७ रुपये हातात येतील. पण आता गुंतवणुकीचा कालावधी ५-५-५ वर्ष असा आणखी १५ वर्षांनी वाढवला की २० वर्षांनंतर एकूण मूल्य ५३,२६,६३१ रुपये त्यानंतर २५ वर्षांनंतर ८२,४६,४१२ रुपये आणि ३० वर्षांनंतर एकूण मूल्य १,२३,६०,७२८ रुपये होईल. अशाप्रकारे, वयाच्या ५५ व्या वर्षी तुम्ही करोडपती झाला असाल. याशिवाय जर तुमच्यासाठी १० हजार रुपये दरमहिना गुंतवणूकही शक्य नसेल तर दरमहा फक्त ७,५०० रुपये गुंतवूनही तुम्ही वयाच्या ५५ व्या वर्षी करोडपती होऊ शकता, पण तुम्हाला वयाच्या विसाव्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात करावी लागेल.

करोडपती होण्याची ट्रिक काय?
निवृत्तीसाठी करोडो रुपयांचा फंड जमा करण्याची ही ट्रिक लक्षात ठेवा – दीर्घकालीन धोरण. पीपीएफमध्ये तुम्हाला व्याजावर कम्पाउंडिंग व्याजाचा लाभ मिळतो. म्हणजे तुम्ही जितका जास्त काळ गुंतवणूक करत राहाल तितका जास्त नफा मिळेल आणि रक्कमही कमी होईल. करोडपती बनण्याची एकमेव युक्ती आहे, त्यामुळे गुंतवणूक सुरू करा आणि तुमचा बँक बॅलन्स तयार करा.

Read Latest Business News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *