[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसने प्रवास करताना मोबाइलवर हेडफोन किंवा इअरफोनशिवाय गाणी ऐकल्यास, चित्रपट पाहिल्यास अथवा मोठ्या आवाजात बोलल्यास संबंधित प्रवाशावर कारवाई होणार आहे.

काही प्रवासी मोबाइलवर मोठमोठ्या आवाजात ऑडिओ/व्हिडिओ ऐकतात-पाहतात. त्यामुळे इतर प्रवाशांना नाहक त्रास होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने मोबाइलचा आवाज करणाऱ्यांवर ‘मुंबई पोलिस अधिनियमा’नुसार, दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे.

‘पीएमपी’कडून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यात बससेवा पुरविण्यात येते. त्यासाठी ३९६ मार्गांवर दररोज १,७८५ बसगाड्या धावतात. त्यातून दररोज सरासरी १३ लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. बस प्रवासादरम्यान बहुतांश प्रवासी मोबाइलचा वापर करतात. त्यापैकी काही प्रवासी हेडफोन किंवा इअरफोनचा वापर न करता ऑडिओ-व्हिडिओचा आवाज मोठा ठेवतात. त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो. त्यावरून अनेकदा वादावादी होते. मोबाइलचा आवाज करणाऱ्या प्रवाशाला वाहकाने समजावून सांगितल्यास त्यांना उलटे सुनावले जाते. त्या पार्श्वभूमीवर पीएमपी बसमध्ये असताना हेडफोन किंवा इअरफोनशिवाय मोबाइलवर ऑडिओ-व्हिडिओ ऐकण्यास, पाहण्यास; तसेच मोबाइलवर मोठमोठ्या आवाजात बोलण्यास प्रवाशांना मनाई करण्यात आली आहे. मात्र, वाहकाकडून तिकीट घेतानाही हेडफोन-इअरफोनचा वापर करू नये, अशी सूचना पीएमपी प्रशासनाने केली आहे.

ही होऊ शकते कारवाई

पीएमपी बसमध्ये मोठ्या आवाजात मोबाइलचा वापर केल्यास संबंधितांवर ‘मुंबई पोलिस अधिनियमाच्या कलम ३८/११२’नुसार कारवाई करण्याचा इशारा पीएमपी प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गोंगाट करून शांतता भंग केल्याप्रकरणी संबंधित प्रवाशांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराचं कारण सांगितलं, राजकीय रंग देऊ नका म्हणत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *