[ad_1]

सोलापूर: लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभूत होऊनही मला भारतीय जनता पक्षाची ऑफर असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनी केला. मला आणि प्रणिती शिंदेंना भाजपची ऑफर आहे. पण आम्ही काँग्रेस सोडणार नाही. ज्या पक्षात वाढलो, जिथे बालपण, तरुणपण गेलो. त्या पक्षाला सोडून आता दुसरीकडे कसं जाणार, असा सवाल करत आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं ते म्हणाले.एका हुडा पार्टीच्या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदेंचं भाषण झालं. त्यात शिंदेंनी आपल्याला भाजप प्रवेशाची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला. दोन वेळा पराभव झालेला असतानाही मला भाजपकडून ऑफर आहे. प्रणिती शिंदेंनादेखील भाजप प्रवेशाची ऑफर आहे. पण आमची विचारधारा काँग्रेसची आहे. ज्या आईच्या कुशीत बालपण आहे. ज्या पक्षात तारुण्य गेलं. आता मी ८३ वर्षांचा आहे. या वयात मी पक्ष कसा सोडणार? मी काँग्रेसमध्येच राहणार, असं शिंदेंनी म्हटलं.शिंदेंनी केलेल्या विधानावर भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. सुशीलकुमार शिंदे मोठे नेते आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी महत्त्वाची पदं भूषवली आहेत. सध्या काँग्रेसमधील अनेक नेत्यांना पक्षात काही होईल असं वाटत नाही. त्यांना भवितव्याबद्दल साशंकता आहे. संपूर्ण देशाचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. त्यामुळे अनेकांना भाजपमध्ये यायचंय, असं महाजन म्हणाले.माझं शिंदेंशी बोलणं झालेलं नाही. त्यांना कोणी ऑफर दिली या प्रश्नाचं उत्तर तेच देऊ शकतात. ते पक्षात आल्यास त्यांचं स्वागतच करू, असं महाजन यांनी म्हटलं. शिंदेंना सोलापूर लोकसभेचं तिकिट देण्यात येईल का, असा प्रश्न विचारला असता याचा निर्णय केंद्रीय समिती घेईल. पण शिंदे पक्षात आल्यास त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, असं महाजन म्हणाले. महाजनांच्या विधानाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी तिखट शब्दांत समाचार घेतला. भाजप सत्तेसाठी किती हापापलेली आहे तेच यातून दिसतं. भाजप कायम विचारधारेबद्दल बोलतो. पण त्यांच्या विचारसरणीची माणसं मोठी झालेली नाहीत. त्यामुळेच त्यांना काँग्रेसच्या नेत्यांची गरज लागते. सध्याच्या भाजपमधील ६० ते ७० टक्के नेते काँग्रेसमधलेच आहेत. आपल्याला पक्ष सोडायचा नसल्याचं शिंदेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे भाजपनं काँग्रेसच्या नेत्यांच्या नादाला लागू नये, असा इशारा पटोलेंनी दिला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *