[ad_1]

गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात सणासुदीच्या काळात अवैधरित्या देशी-विदेशी दारूची तस्करी केली जात आहे. गोपनीय माहितीच्या आधारे जिमलगट्टा पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी नाकाबंदी करत देशी दारुसह तब्बल २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आली. यातील आरोपी कैलास मडावी याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरित्या छुप्या रितीने दारुविक्री व वाहतुक केली जाते. अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सिरोंचा ते आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गावर दारू तस्करी होणार असल्याची माहिती मिळताच जिमलगट्टा पोलिसांनी नाकाबंदी करत एम.एच. ४० सी.डी. ५३३० या जड वाहनाची जडती घेतली असता रॉकेट कंपनीचे संत्रा देशी दारुचे २७० बॉक्स वाहतूक करताना आढळले.

एका हाताने वायपर-एका हाताने स्टेअरिंग चालवत चालकाचा १२० किमी प्रवास, थरारक VIDEO
लगेच पोलिसांनी सदर जड वाहनासह आरोपीला ताब्यात घेऊन जिमलगट्टा उप पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला. दारूची किंमत १० लाख तसेच सदर वाहनाची किंमत १५ लाख असे एकूण २५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, प्रभारी अधिकारी संगमेश्वर बिराजदार व इतर स्टाफ यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. संगमेश्वर बिराजदार हे करीत आहेत.

गडचिरोलीच्या किरणची इंग्लंड वारी सुकर, ४० लाखांची स्कॉलरशीप, CM शिंदेंचा ऑन द स्पॉट निर्णय
विशेष म्हणजे सिरोंचा ते अल्लापल्ली या राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील या जड वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध दारू तस्करी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील काही दिवसंपासून गडचिरोली पोलिसांनी गांजा व अवैध दारू तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे, असे असताना देखील राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनातून अवैध दारू तस्करी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

तलाठी ऑन ड्युटी दारुच्या नशेत; सातबाऱ्यावर सही करताना जमिनीवर कोसळला

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *