[ad_1]

मुंबई : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा डीप फेक व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सचिनची लेक सारा तेंडुलकरबद्दल काही गोष्टी त्याच्या तोंडून वदवण्यात आल्या आहेत. याबाबत सचिनने पोलिसांमध्ये तक्रार केली होती. पोलिसांनी या गोष्टीचा सखोल तपास केला आणि त्यानंतर सचिनचा हा व्हिडिओ फिलिपाइन्समधून अपलोड केल्याचे आता समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये सचिनने नेमकं काय म्हटलं आहे, ते ऐकून चाहतेही हैराण होतील.
डीप फेक व्हिडिओमध्ये सारा तेंडुलकरबद्दल काय म्हटले गेले आहे…या व्हिडिओमध्ये सचिनला असे बोलताना दाखवले आहे की, ” माझी मुलगी सध्याच्या घडीला असा गेम खेळत आहे, ज्याचे नाव एविएटर असा आहे. हा स्कायवर्ड एविएटर क्वेस्ट अॅप आहे. हा गेम खेळत माझी मुलगी दिवसाला १.८० लाख रुपये कमावते आहे. कधी कधी मला आश्चर्य वाटते की, चांगल्या प्रकार पैसा कमावणे आता किती सोपे झाले आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा अॅप मोफत आहे, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही आणि ते सहजपणे डानलोडही करता येऊ शकते.”

सचिनने यावर काय दिले स्पष्टीकरण…
सचिनने हा व्हिडिओ पाहिल्यावर याबाबत आपले स्पष्टीकरण दिले आहे. सचिनने सांगितले आहे की, ” या प्रकारचा कोणताही व्हिडिओ मी केलेला नाही. तसा व्हिडिओ दिसल्यास त्याची तक्रार करायला हवी. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर राहण्यासाठी सतर्क असायला हवे.”

सायबर पोलिसांनी आतापर्यंत काय तपास केला आहे, जाणून घ्या…
डीप फेक या तंत्रज्ञानाचे शिकार बॉलीवूडमधील आलिया भट आणि रश्मिका मानधना झाल्या होत्या. त्यानंतर आता सचिनबरोबरही ही वाईट गोष्ट घडली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सचिनचा आवाज एवढा हुबेहुब काढला आहे की, चक्क तोच आपल्याशी बोलतो आहे असे वाटते. त्यामुळे बरेच सचिनचे चाहते या व्हिडिओला बळी पडले होते. जेव्हा सचिनला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने हे आपण बोललो नसल्याचे सर्वांना सांगितले. त्यानंतर सचिनचे स्वीय सहाय्यक रमेश पारधे यांनी या गोष्टीची तक्रार पश्चिन विभागीय सायबर पोलिसांकडे केली. त्यानंतर या गोष्टीचा छडा सायबर पोलिसांनी लावला आहे आणि ही गोष्ट फिलिपाइन्समधून घडल्याचे त्यांनी शोधून काढले आहे. आता सायबर पोलिस या गोष्टीचा अजून तपास करत आहेत आणि ज्या इमेल आयडीवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे, त्याचा तपास आता पोलिस करत आहेत.

मास्टर ब्लास्टर आमिरच्या लेकीच्या रिसेप्शनला

सध्याच्या घडीला तंत्रज्ञान एवढे विकसित झालेले पाहायला मिळत आहे की, त्याला तोड नाही. पण या तंत्रज्ञानाचे असाही गैरवापर केला जाऊ शकोत, हे आता समोर आले आहे. सचिनसारख्या दिग्गज व्यक्तीच्या तोंडामधून कोणत्याही गोष्ट वदवून घेतल्या जात आहेत. त्यामुळे या गोष्टीवर रोख लावण्यासाठी कोणती उपाय योजना भविष्यात केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *