नाशिक: छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवून त्यांना ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञात व्यक्तींकडून आपल्याला ठार मारले जाईल, असे एका पत्राद्वारे त्यांच्यापर्यंत पोहचवण्यात आली आहे. या पत्रानंतर छगन भुजबळ यांची पोलिसांनी सुरक्षा वाढवावी, अशी भुजबळांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे.
बाबासाहेबांचं नाव घेऊन सांगतो, हल्लेखोरांना माफ करतो, हल्ल्यानंतर निखिल वागळे यांचं ‘निर्भय’ भाषण
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून होणाऱ्या राजकीय टिपणीमुळे पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी आली आहे. या संदर्भातील एक पत्र भुजबळ यांच्या कार्यालयास प्राप्त झाले आहे. या पत्राच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा असून त्यांच्या निवासस्थाना सहकार्यालय भोवती पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.

भाजप आमदारानं केलेल्या आरोपांची चौकशी करा, गणपत गायकवाड प्रकरणी सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

पत्रात नेमकं काय लिहिलं?
साहेब तुम्हाला उडवण्याची ५ लोकांनी सुपारी घेतली आहे. ते गंगापूर दिंडोरी येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. तुम्हाला मारण्यासाठी त्यांनी ५० लाखांची सुपारी घेतली आहे. या गुंडापासून सावध राहा. हे पाच जण रात्रीपासून तुमचा शोध घेत फिरत आहेत. त्यांची सागर हॉटेलसमोर मिटींग झाली आहे. साहेब तुम्ही सावध राहा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *