अदनान सामीने एक्स (ट्विटर) वर या पार्टीमधील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो इरफान पठाणच्या घरातील आहेत. इरफानने आपल्या निवासस्थानी एका पार्टीचे आयोजन केले होते. यात सुनील शेट्टी, अदनान सामी, हरभजन सिंग आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे खेळाडू सहभागी झाले होते. अदनानने फोटोसोबत कॅप्शन लिहिले, “इरफान पठाणच्या घरी अफगाणिस्तान संघाच्या खेळाडूंसोबत सुंदर संध्याकाळ.” मजा मस्ती, प्रेम, कबाब आणि काबुली पुलाव.” अदनान सामीने शेअर केलेला हा फोटो शेकडो चाहत्यांनी लाइक केला आहे. यासोबतच अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
उल्लेखनीय म्हणजे इरफान पठाणची अफगाणिस्तानच्या खेळाडूंशी चांगली मैत्री आहे. अफगाणिस्तानच्या विश्वचषकातील विजयावर इरफान विशेषतः खूप आनंद व्यक्त करताना दिसला. अफगाणिस्तानच्या खेळाडूंसोबत इरफानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये तो खेळाडूंसोबत डान्स करताना दिसला. याशिवाय अफगाणिस्तानच्या वर्ल्डकपमधील चौथ्या विजयानंतर इरफानने स्टुडिओमध्येच हरभजन सिंगसोबत नाचायला सुरुवात केली होती. यांचा व्हिडीओ त्याने स्वतः ट्विट केला होता.
इरफानने राशिद खान, मोहम्मद नबी आणि नवीन उल हक यांच्यासह संपूर्ण टीमला आमंत्रित केले होते. त्यात इम्रान ताहिर आणि हरभजन सिंगही सहभागी झाले होते. हरभजन आणि इरफानची खूप चांगली मैत्री आहे. युसूफ पठाणही या फोटोमध्ये असल्याचे दिसत आहे.
सध्या वानखेडे मैदानावर अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये लढत सुरु आहे. अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या अफगाणिस्तानचा संघ ३ बाद १८४ धावांवर खेळत आहे.