मुंबई : दरमहिना पगारावर उदरनिर्वाह करणारे बहुतेक लोक बँकांमध्ये साधारणपणे – बचत खाते (सेव्हिंग) आणि चालू (करंट) अकाउंट अशी दोन प्रकारची खाती उघडतात. बचत खातं उघडताना तुम्हाला किमान शिल्लकचा नियम पाळावा लागतो. बँकांची स्वतःची किमान शिल्लक मर्यादा वेगवेगळी असते. बहुतेक लोक बचत खात्यात किमान शिल्लक ठेवत नाहीत, पण खात्यात किमान शिल्लक राखणे फार महत्वाचे असते नाहीतर बँक तुमच्यावर दंडही आकारू शकते. परंतु एखाद्या व्यक्तीचे शून्य शिल्लक खाते असेल तर त्याला किमान शिल्लक राखण्याची आवश्यकता नाही.

लक्षात घ्या की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बचत बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक राखीव ठेवण्याबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नसून बँका अशा खात्यांची देखरेख आणि सर्व्हिसिंग करण्यासाठी लागणारा खर्च विचारात घेऊन किमान शिल्लक ठेवायची आणि किमान शिल्लक न ठेवल्यास विशिष्ट शुल्क आकारण्याचे ठरवतात.

बँकेतून पैसे काढल्यावर भरावा लागणार कर? घ्या जाणून नियम अन्यथा इन्कम टॅक्स विभाग घेऊ शकतो ॲक्शन
आघाडीच्या बँकांमधील बचत खात्यांसाठी किमान शिल्लक मर्यादा

बँक बझारच्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) बचत खाते असल्यास मेट्रो आणि शहरी भागातील SBI बँकेच्या शाखांमध्ये बचत प्लस खाती असलेल्या ग्राहकांना ३,००० रुपये किमान शिल्लक ठेवणे आवश्यक असून निमशहरी भागात असलेल्या SBI बँकेच्या शाखांमध्ये बचत खातेधारकांना २,००० तर ग्रामीण भागातील बचत खातेधारकांसाठी किमान १,००० रुपये शिल्लक खात्यात ठेवणे आवश्यक आहे.
तसेच एचडीएफसी बँकेच्या शहरी आणि मेट्रो ठिकाणी नियमित बचत खाते असलेल्या ग्राहकांनी १०,००० तर ग्रामीण आणि निमशहरी बँक शाखांमध्ये बचत खाती असलेल्या ग्राहकांनी अनुक्रमे ५,००० आणि २,५०० रुपयांची सरासरी मासिक शिल्लक राखली पाहिजे (किंवा किमान एक वर्ष आणि १ दिवसाच्या मुदत ठेवी).

सेव्हिंग अकाउंट, एफडी आणि RD वर मिळत असेल एवढे व्याज तर भरावा लागेल टॅक्स, जाणून घ्या
येस बँकेच्या सेव्हिंग्ज ॲडव्हान्टेज खाती असलेल्या ग्राहकांसाठी १०,००० रुपये खात्यात ठेवले पाहिजे. तर एखाद्या ग्राहकाने किमान शिल्लक आवश्यकता राखली नाही, तर त्यांना दरमहा ५०० रुपयेपर्यंत नॉन मेंटेनन्स शुल्क आकारले जाईल.

मेट्रो आणि शहरी भागात असलेल्या शाखांमध्ये नियमित बचत खाती असलेल्या ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी सरासरी मासिक शिल्लक १०,००० रुपये, निमशहरी आणि ग्रामीण भागातील बचत खाती असलेल्या ग्राहकांनी दरमहा अनुक्रमे ५,००० आणि २,००० रुपये किमान शिल्लक राखली पाहिजे. याशिवाय ग्रामीण भागात नियमित बचत खाते असलेल्या ग्राहकांनी १,००० रुपये किमान शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.

Savings Account: सावधान! सेव्हिंग अकाउंट वापरत नसाल तर ताबडतोब बंद करा, नाहीतर होणार नुकसान
कोटक महिंद्रा बँकेच्या एज सेव्हिंग्स खाती असलेल्या ग्राहकांनी किमान मासिक शिल्लक १०,००० रुपये राखणे आवश्यक असून ग्राहकांनी अट पूर्ण केली नाही तर बँक त्यांना ५०० रुपये पर्यंत मासिक नॉन-मेंटेनन्स शुल्क आकारले जाते. तसेच बँकेने ऑफर केलेल्या कोटक ८११ बचत खात्यात किमान शिल्लक आवश्यक नसून तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड माहितीसह कोटक महिंद्रा ८११ शून्य शिल्लक बचत खाते उघडू शकता.

Read Latest Business NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *