[ad_1]

छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेने ज्यांना खासदार बनवलं त्यांना आता शिंदे गट उमेदवारीही देत नाहीये, त्यामुळे गद्दारांनी विचार करावा, असं वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी केला. भावना गवळी यांना यवतमाळ-वाशिम येथून उमेदवारी दिली गेली नाही. त्यावरुन आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सुनावलं आहे.

ज्यांना शिवसेनेने, उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा खासदार बनवलं. त्यामध्ये एक व्यक्ती अशी आहे की त्यांना पाच वेळा खासदार बनवलं (भावना गवळी), त्यांना दहा तास थांबून सुद्धा तिकीट मिळालं नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी भावना गवळी यांचं नाव न घेता केली.

इतकंच नाही तर, अजून दोन-तीन जणांचं तिकीट कापलं जाणार आहे. मग त्यांच्यासोबत जाऊन नक्की मिळवलं तरी काय? जी गद्दारी करायची होती, उद्धव साहेबांसोबत पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसायचा होता, ते त्यांनी खुपसलंच आहे आणि महाराष्ट्रासोबत बेईमानी केलेली आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
दावेदारी सोडलेली नाही, यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी अर्ज दाखल करणार, भावना गवळींनी ठणकावलं
त्यांनी एक वेळेस सांगितलं होतं की एकही उमेदवार पडला तर राजीनामा देईल, त्यांना ते तिकीट पण देऊ शकत नाही, असे हाल सध्या मिंधे गटाचे झालेले आहेत. त्यांचे जे पुढचे चाळीस गद्दार आहे त्यांनी सुद्धा आता विधानसभेबाबत विचार करावा की आपलं काय होईल. कारण, आता एक-एक विकेट आता कशा पडायला सुरुवात झालेली आहे, हे चित्र दिसू लागलं आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपण पाहत असाल मिंधे गट, भाजप किंवा राष्ट्रवादीची गद्दारी असेल. त्यांना आता उमेदवारच मिळत नाहीये. मुंबईत भाजपने दोनच उमेदवार जाहीर केले ते देखील मुंबई विरोधी, महाराष्ट्र विरोधी आहेत. त्याउलट जास्तीत ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. शिवसेनेचे सर्व उमेदवार जाहीर झाले आहेत. तर मिंधे गट आणि भाजपला उमेदवार मिळत नाहीत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

भावना गवळींचा पत्ता कट, तरी कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी अजूनही विश्वास; म्हणाले, अर्ज दाखल करणार!

भावना गवळींचा पत्ता कट, राजश्री पाटलांना उमेदवारी

लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशिममधून पाचवेळा खासदार म्हणून जिंकून आलेल्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. मतदारसंघात त्यांच्या उमेदवारीला विरोध असल्याने उमेदवार बदला असं भाजपने शिंदेंना सांगितलं होतं. त्यानंतर भावना गवळी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, जो अयशस्वी ठरला. तसेच, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही भेट घेतली. पण, तिथेही त्यांना यश आलं आहे. त्यानंतर शिंदे गटाकडून या मतदारसंघात हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे आता भावना गवळी बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचं चित्र आहे. काहीही झालं तरी उमेदवारी अर्ज भरणार असं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *