मुंबई: शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. फेसबुक लाईव्ह दरम्यान त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर हल्लेखोरानं स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. मॉरिस नोरोन्हा असं आरोपीचं नाव आहे. २०२२ मध्ये मॉरिसच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. त्यात त्याला तुरुंगवास घडला. यामागे घोसाळकर यांचाच हात असल्याचा संशय मॉरिसला होता. त्यामुळे त्याला सूड घ्यायचा होता. पोलीस तपासातून ही बाब उघडकीस आली आहे.

करोना काळात, लॉकडाऊन सुरू असताना मॉरिसनं गरजूंना मदत केली. त्या समाजकार्याच्या जोरावर निवडणूक लढवण्याचा त्याचा मानस होता. पण २०२२ मध्ये त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. २०२३ मध्ये त्याला तुरुंगात जावं लागलं. काही महिन्यांनंतर तो तुरुंगातून बाहेर आला. त्याच्याविरोधात आणखी दोन एफआयआरही दाखल झाल्या होत्या. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यानं काही महत्त्वाच्या राजकीय पक्षांशी संपर्क साधलं. निवडणुकीचं तिकिट मिळतंय का याची चाचपणी केली. पण त्याच्या पदरी निराशा पडली.
मॉरिसनं अभिषेक यांना का संपवलं? तपासातून कारणांचा उलगडा; पोलिसांनी घटनाक्रम सांगितला
बलात्काराचा गुन्हा दाखल असल्यानं राजकीय पक्षांनी त्याला निवडणुकीत तिकिट देण्यास नकार दिला. अभिषेक यांच्यामुळेच आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाला. यामागे त्यांचाच हात आहे. त्यांच्यामुळेच आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षाना सुरुंग लागल्याचा मॉरिसचा समज होता. त्यामुळे त्याच्या मनात अभिषेक यांच्याबद्दल राग होता. सूड घेण्याची संधी तो शोधत होता.
डुप्लिकेट चावी, लॉकर अन् पिस्तुल; मॉरिसनं घोसाळकरांच्या हत्येसाठी असा रचलेला फूलप्रूफ प्लान
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मॉरिसनं अभिषेक यांच्याशी जवळीक साधली. मैत्री करण्याचा प्रयत्न केला. मतभेद विसरुन काम करण्याचा प्रस्ताव दिला. शुक्रवारी त्यानं अभिषेक यांना आयसी कॉलनीतील कार्यालयात बोलावलं. साडी वाटपाच्या कार्यक्रमासाठी त्यानं घोसाळकर यांना आमंत्रित केलं होतं. आपण दोघे एकत्र येत असल्याची माहिती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांना देऊ, असं मॉरिसनं अभिषेक यांना सुचवलं.
मॉरिस सतत एकच गोष्ट सांगायचा! ‘त्या’ दिवशी सलग ३ कॉल आले; मॉरिसच्या पत्नीनं काय सांगितलं?
फेसबुक लाईव्ह करुन तुमच्या कार्यालयात जाऊया, असं मॉरिस अभिषेक यांना म्हणाला. लाईव्ह सुरू होण्याआधी अभिषेक अर्धा तास मॉरिसच्या कार्यालयात होते. त्या कालावधीत मॉरिस दोनदा कार्यालयाच्या बाहेर आला. त्यावेळी घोसाळकरांचे कार्यकर्ते, सहकारी बाहेरच उभे होते. अभिषेक कार्यालयाबाहेर पडतील याची ते वाट पाहत होते. त्यांनी अभिषेक यांना उशिर होत असल्याबद्दल विचारणा केली. लाईव्ह संपवून मी पाच मिनिटांत येतो, असं अभिषेक यांनी सांगितलं. त्यानंतर मॉरिसनं लाईव्ह सुरू केलं आणि त्याचवेळी मॉरिसनं अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *