[ad_1]

नवी दिल्ली: भारतीय टेनिस स्टार सुमित नागलने मंगळवारी आपल्या एकेरी कारकिर्दीतील सर्वात मोठे यश संपादन केले आहे. टेनिसमधील सर्वोच्च मानांकित भारतीय खेळाडू नागलने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत २७व्या स्थानी असलेल्या अलेक्झांडर बुब्लिकचा पराभव करून इतिहास रचला. सुमित नागलने आपल्या विजयाचे श्रेय भारतीय क्रिकेट स्टार विराट कोहलीला दिले आहे.

कोहलीबद्दल नेमकं काय म्हणाला?

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अलेक्झांडर बुब्लिकला पराभूत केल्यानंतर सुमित नागलने सोनी स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तो कधी कधी विराट कोहलीशी बोलतो. तो म्हणाला की कोहलीने त्याच्या गरजेच्या वेळी त्याला मदत केली नसती तर त्याचे जीवन कसे असते याची कल्पना करणे त्याच्यासाठी कठीण असल्याचे तो म्हणाला.

नागल हा विराट कोहलीच्या फाउंडेशनचा एक भाग आहे आणि २०१९ मध्ये, त्याने एका विधानात सांगितले होते की त्याच्या कठीण काळात त्याला कशी मदत मिळाली. त्यावेळी नागलकडे स्पर्धेत भाग घेण्यासाठी विमानाचे तिकीट काढण्याइतके पैसे नव्हते.

सुमित म्हणाला, “मी कधी कधी त्याच्याशी (विराट) बोलतो. मी पण त्याच्या फाउंडेशनचा एक भाग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी त्याचे आभार मानू इच्छितो. क्रिकेट बघायला कोणता भारतीय आवडणार नाही? मी क्रिकेट फॉलो करतो आणि संधी मिळेल तेव्हा क्रिकेट पाहतो.”

नागल म्हणाला, “विराट कोहलीची फाउंडेशन मला २०१७ पासून सपोर्ट करत आहे. मी गेली दोन वर्षे चांगली कामगिरी करत नव्हतो आणि पैशांची कमतरता जाणवत होती. जर विराट कोहलीने मला पाठिंबा दिला नसता तर माझे काय झाले असते हे मला माहीत नाही.” नागल म्हणाला की, कॅनडाहून जर्मनीला जाताना त्याच्याकडे फक्त सहा डॉलर्स असल्याने त्याला अडचणी येत होत्या, पण कोहलीनेच त्याला कठीण काळात मदत केली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *